म्हाडा खोटी जात प्रमाणपत्र सादर करणार्‍या विजेत्यांवर गुन्हा दाखल करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडा खोटी जात प्रमाणपत्र सादर करणार्‍या विजेत्यांवर गुन्हा दाखल करणार

Share This
मुंबई - म्हाडाच्या महाघोटाळ्यातील पाचपैकी दोन जात पडताळणी प्रमाणपत्राचा अहवाल संबंधित विभागाकडून नुकताच म्हाडाला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार ही दोन्ही प्रमाणपत्र बोगस असल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  या दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल करीत घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे.

महिनाभरापूर्वी उघड झालेल्या महाघोटाळा प्रकरणातील पाच संशयास्पद फाइल्स म्हाडाने विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठविल्या होत्या. त्यानुसार संजय धाकू पांचाळ आणि संजय कृष्णा मुरुडकर या दोन विजेत्यांच्या फाइल्सचा अहवाल नुकताच विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक-३ येरवडा, पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. या दोन्ही जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, स्कॅनिंग अभिलेखात ही प्रमाणपत्रे आढळत नाहीत असा स्पष्ट शेरा समितीने दिला असल्याने ही दोन्ही प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या दोन्हीप्रकरणी गुन्हा दाखल करीत पुढील कडक कारवाई करण्याचा म्हाडाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, उर्वरित तीन प्रमाणपत्रांचा अहवाल आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages