मुंबई : परिवहन विभागाच्या आरटीओ क ार्यालयांमध्ये दलालांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला आता आठवडा झाला आहे. आरटीओ कार्यालयामध्ये सर्व कामे ही दलालांमार्फत केली जातात. त्यामुळे दलाल आरटीओमधून हद्दपार झाल्याने नागरिकांना स्वत:ची कामे स्वत: करावी लागत आहेत. असे जरी असले तरी आरटीओमधील महसुलाचा आकडा हा आठवडाभरात २५ टक्क्यांवर आल्याचे दिसून आले आहे.
मुंबईच्या तीन आरटीओ कार्यालयांमध्ये दलालांना बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये आणि आरटीओ कार्यालयांचा कारभार पारदर्शक व्हावा हा या क ारवाईमागचा परिवहन आयुक्त महेश झगडे यांचा हेतू आहे. परंतु आरटीओ कार्यालयामधून दलाल हटले आणि परिवहन विभागाचा महसूल घटल्याचे दिसून आले आहे. परिवहन विभागाचा वर्षाला सुमारे ५ हजार कोटी इतका महसूल जमा केला जातो. ताडदेव आरटीओमधील महसुलाचा आकडा आठवडाभरात २५ टक्क्यांवर आला आहे. या कालावधीत महसुलाचा आकडा ७ कोटी ८0 लाखांवरून थेट २ कोटीपर्यंत रोडावला आहे. मात्र या आकडेवारीचा एकंदरीत महसुलावर परिणाम होणार नसल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे.

ड्रायव्हिंग स्कूलसाठी एक प्रतिनिधीआरटीओमध्ये मागच्या दाराने दिले जाणारे प्रवेश लक्षात घेऊन परिवहन आयुक्तांनी प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूलसाठी एका प्रतिनिधीला अधिकृतपणे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे मुंबईत एकूण २५0 ड्रायव्हिंग स्कूल असून त्यांच्याकडील शिकाऊ चालकांना याचा फायदा होणार आहे. त्या प्रतिनिधीला ओळखपत्र दिले जाणार असल्याचे समजते.
ताडदेव आरटीओचा महसूल (जानेवारी २0१५)
तारीख महसूल
१२ जानेवारी १,0२,६८,९५२
१३ जानेवारी २,४६,१६,६२१
१४ जानेवारी १,२८,७५,३0७
१५ जानेवारी १,६२,0३,६0८
१६ जानेवारी ८५,६८,0८८
१७ जानेवारी ५४,२८,७१३
एकूण ७,७९,६१,२८९
१२ जानेवारी १,0२,६८,९५२
१३ जानेवारी २,४६,१६,६२१
१४ जानेवारी १,२८,७५,३0७
१५ जानेवारी १,६२,0३,६0८
१६ जानेवारी ८५,६८,0८८
१७ जानेवारी ५४,२८,७१३
एकूण ७,७९,६१,२८९
दलालांविरुद्ध कारवाई सुरू झाल्यापासूनतारीख महसूल
१९ जानेवारी १६,५५,२१४
२0 जानेवारी ३७,0६,३४९
२१ जानेवारी २0,१६,८७९
२२ जानेवारी ४७,0२,0७६
२३ जानेवारी ७९,५८,३६५
एकूण २,00,३८,८८३
१९ जानेवारी १६,५५,२१४
२0 जानेवारी ३७,0६,३४९
२१ जानेवारी २0,१६,८७९
२२ जानेवारी ४७,0२,0७६
२३ जानेवारी ७९,५८,३६५
एकूण २,00,३८,८८३