डॉ. आंबेडकरांचे लंडन येथील निवासस्थान खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकरांचे लंडन येथील निवासस्थान खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू

Share This
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील वास्तव्य ज्या घरात होते ते घर खरेदी करण्यासंदर्भात राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुढील पाऊल उचलले आहे. हे घर खरेदी करण्यासाठी तावडे यांनी लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तांना ‘लेटरऑफ इंटेंट’ अर्थात इरादापत्र पाठवले आहे. भारताच्या लंडनमधील उच्चायुक्तांमार्फत राज्य सरकार घर खरेदीची प्रक्रिया करणार आहे.

इरादापत्रात तावडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडन येथील लाखो भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद असलेली ही वास्तू खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेसाठी विनोद तावडे नुकतेच लंडन इथे गेले होते. त्यावेळी त्यांनी खरेदी करण्यासंदर्भातील व्यवहाराची माहिती घेतली होती. हे घर विकण्यासाठी जाहीरात काढण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तावडे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तावडे यांनी तातडीने बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय उच्चायुक्तचे अधिकारी यांच्यासमवेत डॉ. आंबेडकर यांच्या त्या निवासस्थानाला भेटही दिली आणि इंडिया हाउसमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त रंजन मथाई, संतोष दास व तेथील उच्च अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. पुढील २ महिन्यांत यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages