मेट्रो स्थानकांवर ६१ अनधिकृत स्टॉल्स - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रो स्थानकांवर ६१ अनधिकृत स्टॉल्स

Share This
मुंबई : मेट्रो रेल्वेच्या घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील एकूण ८७ स्टॉल्सपैकी केवळ २६ स्टॉल्स अधिकृत आणि ६१ स्टॉल्स अनधिकृत आहेत, अशी धक्कादायक माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. विशेष म्हणजे, मेट्रो रेल्वेचे संचलन करणार्‍या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीला या अधिकृत आणि अनधिकृत स्टॉल्सधारकांकडून दरमहा उत्पन्न मिळत आहे. 

२६ ऑगस्ट २0१४ रोजी मनसेचे नगरसेवक भालचंद्र आंबुरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत या स्टॉल्ससंबंधीची माहिती पालिकेकडे मागितली होती. त्यानंतर पालिकेने ही आकडेवारी दिली आहे. अंधेरी पूर्व (के/पूर्व) भागातील मेट्रो स्थानकात दोन अधिकृत आणि तब्बल २१ अनधिकृत, अंधेरी पश्‍चिम (के/पश्‍चिम) विभागातील स्थानकात २१ अधिकृत आणि ३८ अनधिकृत स्टॉल्स आहेत. कुर्ला 'एल' विभागातील रेल्वे स्थानकात एक अधिकृत आणि दोन अनधिकृत स्टॉल आणि घाटकोपर (एन) विभागातील रेल्वे स्थानकात दोन अधिकृत स्टॉल आहेत. तसेच या सर्व २६ अधिकृत स्टॉलधारकांकडून दरमहा ९0 रुपयांपासून ते ७५0 रुपये आणि ६१ अनधिकृत स्टॉल्सकडून दरमहा किमान १२0 रुपये ते ८१६0 रुपये भाडे मिळत आहे. या स्टॉल्सधारकांत आरे सरिता, गटई स्टॉल, कॉब्लर पिच, अपंग दूरध्वनी आदींचा समावेश आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages