मुंबई : रेल्वे प्रशासनाने मोठा गाजावजा करत प्रवाशांच्या सोयीसाठी आणलेली मोबाइल रेल्वे तिकीट योजनेचा बोर्या वाजला आहे. योजना सुरू होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही प्रवाशांच्या पसंतीस उतरली नाही. परिणामी, महिन्याभरात केवळ १ हजार ७८ जणांनी या योजनेतून तिकीट काढले असून, केवळ १८ हजार ४३0 रुपयांचा नफा मध्य रेल्वेस झाला.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात दादर स्थानकात मोबाइल तिकीट योजनेचा शुभारंभ झाला होता.तिकीट खिडक्यांवरील गर्दी यामुळे कमी होईल, असा कयासा वर्तवण्यात येत होता. मोबाइलवरून तिकीट काढल्यानंतर पुन्हा एटीव्हीएम मशीनसमोरील रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे प्रवासी नाराज झाले होते. तसेच या प्रणालीचे अँपल्किेशन डाऊनलोड करण्यास अनेक तांत्रिक समस्या आड येत होत्या. एका वेळेस द्वितीय श्रेणीचे ४ व प्रथम श्रेणीचे केवळ १ तिकीट काढता येणे हा मोठा तोटा आहे. याशिवाय मोबाइलसाठी लागणार्या मशीन सर्व स्थानकांत उपलब्ध नाहीत. अद्यापि ३१४ प्रवाशांनी आर वॉलेट हे अँप्स डाऊनलोड केले आहे. याद्वारे अवघे ४९ हजार उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मोबाइल तिकीट प्रणाली सुरू होऊन केवळ महिना उलटला आहे. प्रवाशांना ही योजना समजण्यात वेळ जाईल. त्यामुळे ही योजना अपयशी झाल्याचे म्हणता येणार नाही. आगामी काळात ही योजना प्रवाशांना नक्कीच पसंत पडेल, असे मध्य रेल्वेच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.
प्लॅटफॉर्मवर स्कॅनर बसवणार
मोबाइल तिकीट योजनेला प्रवाशांचा मिळालेला अल्प प्रतिसाद लक्षात घेता, रेल्वे मंत्रालय नवे तंत्रज्ञान आणण्याच्या विचारात आहे. सध्या मोबाइलवर तिकीट बुक केल्यानंतरही एटीव्हीएम मशीनवर जाऊन पुन्हा पासवर्ड नमूद करावा लागतो. मात्र आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्कॅनर बसवण्यात येणार आहे. यामुळे वन टाईम पासवर्डमधून प्रवाशांची सुटका होणार आहे.