मेट्रोच्या दरवाढीमुळे बेस्टला अच्छे दिन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रोच्या दरवाढीमुळे बेस्टला अच्छे दिन

Share This
आठवडाभरात २२ हजार प्रवाश्यांची तर २ लाखांच्या उत्पन्नात वाढ 
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईमध्ये घाटकोपर अंधेरी मार्गावर सुरु झालेल्या मेट्रोमुळे बेस्टच्या या मार्गावरील बसेस तोट्यात चालल्या होत्या. परंतू मागील आठवड्यात मेट्रोची दरवाढ झाल्यानंतर मेट्रोकडे प्रवाश्यांनी पाठ फिरवल्याने बेस्टकडे प्रवाश्यांचा ओघ वाढत चालला आहे. गेल्या ९ जानेवारी ते १४ जानेवारी या आठवडाभरात बेस्टच्या ३४० क्रमांकाच्या बसमार्गावर २२ हजार ३८८ प्रवासी वाढले असून २ लाख ११ हजार रुपयांचे उत्पन्न बेस्टला जास्त मिळाले असल्याने मेट्रोच्या दरवाढी मुळे बेस्टला अच्छे दिन आले आहेत असेच म्हणावे लागेल.

बेस्टच्या घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर चालणाऱ्या ३४० या बसमार्गावर मागील आठवड्याच्या तुलनेत ९ जानेवारीला १७९८५ प्रवाश्यांनी प्रवास केला. यामधून बेस्टला १ लाख ८२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यादिवशी १७९२ प्रवाश्यांची तर २३ हजार रुपयांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. १० जानेवारीला १९७३२ प्रवाश्यांकडून १ लाख ९९ हजारांचे उत्पन्न मिळालेले आहे. यादिवशी २९१९ प्रवासी वाढले असून ३२ हजार रुपयांची उत्पन्नात वाढ झाली आहे. ११ जानेवारीला १५७२५ प्रवाश्यांनी प्रवास केला असून यामधून बेस्टला १ लाख ६३ हजारांचे उत्पन्न मिळालेले आहे. यादिवशी ४३८१ प्रवासी वाढले असून बेस्टच्या उत्पन्नात ५१ हजार रुपयांची वाढ झाली आहे.  

याच मार्गावर १२ जानेवारीला १९५३२ प्रवाश्यांनी प्रवास केला आहे यामधून बेस्टला १ लाख ९८ हजार उत्पन्न मिळाले. यादिवशी ४१६७ प्रवासी आणि उत्पन्नात ४४ हजारांची वाढ आहे. १३ जानेवारीला १८५०३ प्रवाश्यांनी प्रवास केला. यामधून बेस्टला १ लाख ८७ हजाराचे उत्पन्न मिळालेले आहे. यादिवशी २८०५ प्रवाश्यांची तर उत्पन्नात २६ हजारांची वाढ झाली आहे. १४ जानेवारीला २०४४६ प्रवाश्यांकडून बेस्टला २ लाख ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे. यादिवशी बेस्टमध्ये ३३२४ प्रवाश्यांची तर उत्पन्नात ३५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. मेट्रोकडे जाणाऱ्या इतरही मार्गावर बेस्टला प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामधून बेस्टला चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी दिली आहे. 

दर वाढी आधी                         दर वाढी नंतर                           वाढ 
दिनांक  उत्पन्न  प्रवासी      दिनांक  उत्पन्न   प्रवासी       प्रवासी  उत्पन्न
२/१/१५ १.६९लाख १६१९३     ९/१/१५   १.८२लाख १७९८५    १७९२   २३ हजार 
३/१/१५ १.६७लाख १६८१३    १०/१/१५  १.९९लाख १९७३२    २९१९    ३२ हजार 
४/१/१५ १.१२लाख  ११३४४   ११/१/१५   १.६३लाख १५७२५  ४३८१   ५१ हजार 
५/१/१५ १.५४लाख १५३६५  १२/१/१५  १.९८लाख १९५३२   ४१६७    ४४ हजार 
६/१/१५ १.६१लाख  १५६९८    १३/१/१५  १.८७लाख १८५०३   २८०५   २६ हजार 
७/१/१५ १.७१लाख १७१२२    १४/१/१५  २.०६लाख २०४४६  ३३२४   ३५ हजार 

(९ जानेवारी ते १४ जानेवारी)  
एकूण वाढ  
२२३८८ प्रवासी   
२ लाख ११ हजार उत्पन्न 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages