मुंबई मॅरेथॉनमुळे बेस्टच्या काही मार्गांत बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई मॅरेथॉनमुळे बेस्टच्या काही मार्गांत बदल

Share This
मुंबई : रविवारी १८ जानेवारी रोजी मुंबई मध्ये मुंबई मॅरेथॉन होणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने आपल्या बेस्ट गाड्यांच्या वाहतुकीमध्ये बदल केला आहे. रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक १0५, १0६, १0८, ११२, १२३, १२५, १३३ आणि १५५ या बसमार्गाचे प्रवर्तन तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मंत्रालय,मेयो रोड (हुतात्मा चौक), बाबुलनाथ, वाळकेश्‍वर, कमला नेहरू पार्क, वरळी डेअरी अँण्ड ग्रॅट रोड स्थानक या बसचौक्यादेखील दुपारी १२ वाजेपर्यंत तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत. 


मात्र, दुपारी १२ नंतर हे सर्व बसमार्ग आणि बसचौक्या पूर्ववत कार्यरत राहणार आहे. भेंडी बाजार, महात्मा फुले मार्केट, सीएसटीकडून कुलाबा, नेव्ही नगरकडे जाणारे बसमार्ग सरदार वल्लभभाई पटेल मार्ग-वाडी बंदर-कर्नाक बंदर-पी. डिमेलो रोड-शहीद भगतसिंग मार्गाने चालवण्यात येणार आहेत. तसेच कृष्णचंद मार्गाने (लीलावती हॉस्पिटल)-वांद्रे रिक्लेमेशनक डे जाणारे सर्व मार्ग हे हिल रोड मार्गे चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वीर सावरकर मार्गावरून चालवण्यात येणारे बसमार्ग परळ एसटी आगार-पांडुरंग बुधकर मार्ग- कॉ. पी. के. कुरणे चौक-जी. एम. भोसले मार्ग-ई. मोझेस मार्ग-महालक्ष्मी रेसकोर्स, हाजीआली-वसंतराव नाईक चौक-नाना चौक-पंडित पळुस्कर चौक मार्गे चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages