परेवर २६ जानेवारीला बम्बार्डियर लोकल धावण्याची शक्यता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परेवर २६ जानेवारीला बम्बार्डियर लोकल धावण्याची शक्यता

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वेने लटकत-लोंबकळत घामाघूम होऊन प्रवास करणार्‍या मुंबईकरांसाठी एक खूशखबर आहे. रेल्वे बोर्डाने चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात तब्बल १२ एसी लोकलची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी एक एसी लोकल तयार झाली असून ती येत्या काही महिन्यांतच मुंबईत दाखल होणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी बम्बार्डियर लोकल येत्या २६ जानेवारीला पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावण्याची शक्यता आहे. 

मुंबईकरांसाठी रेल्वे बोर्डाने १२ एसी लोकलची ऑर्डर चेन्नईत दिली आहे. या आधुनिक ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणार्‍या लोकलपैकी पहिली लोकल बांधून तयार झाली असून ती येत्या काही महिन्यांतच दाखल होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबईकरांसाठी एकूण ११ हजार कोटींचे प्रकल्प मंजुरीसाठी बोर्डाकडे पाठवले असल्याचे महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय स्ांचालक प्रभात सहाय यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जागतिक बँक आणि सरकारच्या ५0-५0 टक्के खर्चातून ही कामे केली जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच मध्य रेल्वेच्या पनवेल-कर्जत दुहेरी ट्रॅकच्या निर्मितीमुळे मुंबईकरांसाठी येथेही उपनगरीय लोकल चालवण्याचा मार्ग खुला होणार आहे. त्यासाठी १५६१ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कळवा-ऐरोली ट्रान्सहार्बर लिंकचे कामही मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. ही लाईन पूर्ण झाल्यास कल्याणहून प्रवाशांना वाशीला जाण्यासाठी आता ठाण्याला उतरण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे ठाणे स्थानकावरील प्रवाशांचा भारदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. विरार-डहाणूदरम्यान दोन मार्ग यापूर्वीच आहेत. आता तेथे २५५८ कोटी रुपये खर्च करून ३री आणि ४थी लाईन टाकण्यात येणार आहे. ३री लाईन उपनगरीय सेवेसाठी तर ४थी लाईन मेनलाईन लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहे. एमयूटीपी फेज-३ अंतर्गत २0 रेल्वे स्थानकांच्या परिसरांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

प्रस्ताव            सध्याचा खर्च अंदाजित खर्चपनवेल-कर्जत दुहेरी मार्ग  १५६१ कोटी  २0२४ कोटी
ऐरोली-कळवा लिंक       ३५६ कोटी   ४२८ कोटी
विरार-डहाणू मार्ग       २0४६ कोटी  ३५५५ कोटी
डब्यांसाठी खर्च         २३५0 कोटी   २८९९ कोटी
ट्रेसपास कंट्रोल          ४00 कोटी    ५२0 कोटी
स्थानकांचा विकास     १५00 कोटी    १९५0 कोटी
तांत्रिक कामांसाठी        ५0 कोटी      ६५ कोटी 
एकूण            ८७७५ कोटी  ११४४१ कोटी

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages