पहिलीला प्रवेश ६ वर्षांनंतरच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पहिलीला प्रवेश ६ वर्षांनंतरच

Share This
मुंबई : शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्‍चितीच्या प्रस्तावास अखेर शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. इयत्ता पहिलीसाठी वयोर्मयादा ६ वर्षे व नर्सरी-प्ले ग्रुपसाठी ३ वर्षे करण्यात आली आहे. पहिलीच्या प्रवेशाच्या वयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस पूर्व प्राथमिक व पहिलीसाठी वेगवेगळी वयोर्मयादा ग्राह्य धरून प्रवेश दिले जातात. 


शाळा प्रवेशाच्या वयात एकवाक्यता आणण्यासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने शासनाला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळत नसल्याने २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार होते. अखेर याची दखल घेत शासनाने वय प्रवेशाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पहिलीसाठी वयोर्मयादा ६ वर्षे व नर्सरी-प्लेग्रुपसाठी ३ वर्षे करण्यात आली आहे. इयत्ता पहिलीसाठी प्रवेशाच्या वयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. 

राज्य सरकारने २0१0 सालच्या आदेशाने पहिलीच्या प्रवेशाचे वय सहा वर्षे ठरवले होते; परंतु त्याबाबतच्या आदेशात संदिग्धता होती. पाच वर्षे पूर्ण झालेल्या बालकांनाही शाळा प्रवेश घेता येत होता. बालवाडी, नर्सरीसाठी प्रवेशाचे वयच ठरवण्यात आले नव्हते; परंतु आता मात्र राज्य सरकारने आदेशातील संदिग्धता दूर केली आहे. नर्सरी, प्ले ग्रुपच्या प्रवेशासाठी आता तीन वर्षे पूर्ण ही वयोर्मयादा निश्‍चित केली आहे. सीबीएसई, आयसीएसई, आयबी आदी प्रकारच्या शाळांत वेगवेगळ्या वयोर्मयादेत प्रवेश दिला जात होता. आता मात्र त्यांच्यासाठीही एकच वयोर्मयादा ठरवण्यात आली आहे. आता ३१ जुलै रोजीचे वय गृहित धरून शाळा प्रवेश देण्यात येणार आहेत.सन २0१५-१६मध्ये पहिलीसाठी वयाची ५ वर्षे पूर्ण असणारा बालक प्रवेशासाठी ग्राह्यधरण्यात येणार आहे. सन २0१६-१७ मध्ये ५ वर्षे व ४ महिने पूर्ण, सन २0१७-१८ मध्ये ५ वर्षे व ८ महिने पूर्ण व २0१८-१९ मध्ये ६ वर्षे पूर्ण असणार्‍या बालकांना प्रवेश दिले जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

पहिलीसाठी प्रवेशाचे किमान वय 
५ वर्षे पूर्ण २0१५-१६
५ वर्षे व ४ महिने पूर्ण २0१६-१७
५ वर्षे व ८ महिने पूर्ण २0१७-१८
६ वर्षे पूर्ण २0१८-१९

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages