मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाला मंजुरी, कोकण रेल्वे स्थानकांवर कोकणातील पदार्थांना प्राधान्य, सरकते जिने, प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन अत्याधुनिक प्रसाधनगृहे अशा अनेक आश्वासनांचा वर्षाव रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केला आहे; परंतु कोकण रेल्वेला स्वतंत्र विभागीय दर्जा, कोकण रेल्वे मार्गावरील कायमस्वरूपी डबे, वेटिंग लिस्ट कमी करणे, दुसर्या मार्गाला मंजुरी असे अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्यापि बाकी आहेत.
क ोकण रेल्वे मार्गावरून दरवर्षी कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. गेल्या वर्षी तर ३ कोटी १0 लाख प्रवाशांनी कोकण रेल्वेने प्रवास केला. दरवर्षी कोकण रेल्वेला तब्बल २00 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. एवढा मोठा पसारा असणार्या कोकण रेल्वे मार्गावर कोकणच्या प्रवाशांना मात्र कुठेच न्याय मिळताना दिसत नाहीत. क ोकण रेल्वे मार्गावर होणारे रेल्ेवे अपघात, त्यामुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा, कधीही न मिळणारे कन्फर्म तिकीट आणि पावसाळय़ात करावा लागणारा नैसर्गिक आपत्तींचा सामना या सर्व कारणांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास कठीण होत चालला आहे.
जनशताब्दी आणि राज्यराणी एक्स्प्रेस गाड्या १७ डब्यांच्या करण्याचा निर्णय झाला असून रेल्वे बोर्डाने त्याला मंजुरीही दिली आहे. सध्या जनशताब्दी एक्स्प्रेस ९ डब्यांची धावत आहे. राज्यराणी ट्रेन १२ डब्यांची आहे. या दोन्ही ट्रेनला कायमस्वरूपी जादा डबे जोडून त्या १७ डब्यांच्या करण्याचा निर्णय झाला असूनही त्याबाबत काहीच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची सर्वात मोठी समस्या आहे ती वेटिंग लिस्टची. या प्रवाशांना कधीच कन्फ र्म तिकीट मिळत नाही.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळय़ात दरड कोसळणे, जमीन खचणे, पाणी साचण्याचे प्रकार घडतात. पोमेंडी, निवसर, अडवलीसारख्या ठिकाणी तर पावसाळय़ात नेहमीच समस्या उद्भवतात. या ठिकाणी सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही दरडी कोसळतातच. सुरक्षेच्या उपाययोजनांवर कोकण रेल्वेने १९९९ ते एप्रिल २0१३ पर्यंत २९२ कोटी ५२ लाख रुपये खर्च केले आहेत. तर २0१४ मध्ये जवळपास १७ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने १९९९ पासून आतापर्यंत करण्यात आलेला खर्च हा ३00 कोटींपेक्षा जास्त झाला आहे; परंतु यावर कायमस्वरूपी असा कोणताही तोडगा क ाढण्यात आलेला नाही.