महाविद्यालयांनी प्लेसमेंट केंद्र उभारावे - विद्यापीठांची सूचना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाविद्यालयांनी प्लेसमेंट केंद्र उभारावे - विद्यापीठांची सूचना

Share This
मुंबई : शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होताच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने, महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन स्वत:च प्लेसमेंट केंद्र उभारावे, अशी सूचना मुंबई विद्यापीठाने केली आहे. यासंबंधी विद्यापीठ प्रशासनाने ६५0 महाविद्यालयांना दिशानिर्देश जारी केले आहेत.

महाविद्यालयातून डिग्री घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ रोजगाराच्या संधी शोधण्यात जात असल्याचे दिसून आले आहे. संकेतस्थळ किंवा खाजगी प्लेसमेंट केंद्रांना तरूण प्रथम संधी देत आहे. मात्र त्यांना महाविद्यालय जीवनातच रोजगार प्राप्त झाल्यास पुढील मार्ग सुकर होईल. युनिर्व्हसिटी ग्रँड कमिशन म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंबंधी मुंबई विद्यापीठाला निर्देश दिले होते. त्याचे पालन करत विद्यापीठाने महाविद्यालयांना प्लेसमेंट केंद्र उभारण्याची सूचना केली आहे. महाविद्यालयांनी स्वत: उभारलेले प्लेसमेंट केंद्र राष्ट्रीय विकास कौशल्य प्राधिकरणा (एनएसडीसी)बरोबर जोडावे, असे सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

एनएसडीसी ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. आगामी २0२२ पर्यंत जवळपास २0 कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे एनएसडीसीचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने पाऊल टाकत महाविद्यालयात प्लेसमेंट केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.एनएसडीसीने याअगोदरच दिल्ली विद्यापीठाशी करार केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages