पालिकेच्या स्थायी समितीत आयत्यावेळी आणलेले ६५० कोटींचे प्रस्ताव फेटाळले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या स्थायी समितीत आयत्यावेळी आणलेले ६५० कोटींचे प्रस्ताव फेटाळले

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये रस्ते आणि चर बुजवन्याचे ६५० कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नियम धाब्यावर बसवून सदर प्रस्ताव बैठकीच्या आधी एका रात्रीत आणले गेल्याने विरोधी पक्षाने हे प्रस्ताव फेटाळायला भाग पाडले आहे. 

स्थायी समिती मध्ये पश्चिम उपनगरातील के पश्चिम विभागातील १४ आणि आर दक्षिण विभागातील ४ रस्त्यांची सुधरणा सिमेंट कोंक्रिट करण्याचा २४२ कोटी ७१ लाख ८८ हजार ९१० रुपयांचे, मुंबई मधील अंतर्गत व बाह्य रस्त्यावर विविध संस्थांकडून घेतलेल्या चरांचे पुनर्भरनीचे काम करण्यासाठी ३५० कोटी रुपयांचे,  एम पूर्व येथील सुभाष नगर नाल्याची रुंदी आणि खोली वाढवण्यासाठी ४९ कोटी ७० लाख ६ हजार २३३ रुपये असे एकूण ६५० कोटी रुपयांचे प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीच्या आधी एका रात्रीत आणले गेले होते. हे प्रस्ताव त्वरीत मंजूर न केल्यास कामाची किम्मत वाढेल असे कारण देत हे प्रस्ताव त्वरित मंजूर करावे अशी अपेक्षा पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना भाजपाची होती. 

परंतू विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यानी एका रात्रीत आणण्यात आलेल्या प्रस्तावाला विरोध करत हे प्रस्ताव मंजूर करण्यामध्ये सत्ताधारी आणि प्रशासनाचे साटेलोटे असल्याचा आरोप केला. रस्ते आणि चर बुजवन्याचे प्रस्ताव या आधीही स्थायी समिती पुढे आले होते. त्या वेळी प्रस्तावीत किमतीच्या  ६० टक्के कमी दर असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. पुन्हा टेंडर प्रक्रिया करण्याची मागणी विरोधकानी केल्यावर नव्याने प्रस्ताव आणला असल्याने यामध्ये पुन्हा लगेच किम्मत कशी वाढेल असा प्रश्न आंबेरकर यानी उपस्थित केला. तर मनसेचे गतनेते संदीप देशपांडे यानी हे प्रस्ताव नियमानुसार तीन दिवस आधी आणने गरजेचे असताना अचानक प्रस्ताव का आणले असा प्रश्न उपस्थित करत पुढच्या बैठकीमधे हे प्रस्ताव आणावे अशी मागणी केल्याने सदर प्रस्ताव फेटाळून लावण्यात आले आहेत.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages