आणखी १७ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आणखी १७ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

Share This

मुंबई : आपल्या नव्या नेमणुकीवर हजर होण्यात स्वारस्य न दाखविणार्‍या आठ वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांपैकी देबाशिष चक्रवर्ती आणि आशीष शर्मा यांच्यावर मेहेरनजर दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरलेल्या सहा अधिकार्‍यांना येत्या शुक्रवारपर्यंत नेमणुकीच्या जागी रुजू होण्याचे फर्मान काढले आहे. राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात ४२ वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. मंगळवारी सरकारने १७ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.
गेल्या आठवड्यात झालेल्या बदल्यांमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या सचिवपदी देबाशिष चक्रवर्ती आणि जमाबंदी आयुक्त म्हणून आशीष शर्मा यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यास तयारी दाखवली नव्हती. या दोन अधिकार्‍यांवर मेहेरनजर दाखवताना मुख्यमंत्र्यांनी देबाशिष चक्रवर्ती यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, तर आशीष शर्मा यांची महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या बदल्यांनंतर अजूनही आपला कार्यभार न स्वीकारणार्‍या सहा अधिकार्‍यांना बदली करण्यात आलेल्या ठिकाणी येत्या शुक्रवारपर्यंत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंगळवारी बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांपैकी आभा शुक्ला यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे सचिव आणि निवासी आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी या पदावरील वादग्रस्त अधिकारी बिपिन मलिक यांची उचलबांगडी करण्यात आली होती. दुग्धविकास आयुक्त वाय. ई. केरूरे यांची मत्स्यद्योग आयुक्त म्हणून तर सचिन कुर्वे यांची नागपूर येथे मनरेगाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बाकोरिया यांची पुण्यातच क्रीडा आणि युवा विभागाचे आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

धुळ्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उदय चौधरी यांची तर राहुल रेखावार यांची गोंदियाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दीपा मुधोळ यांची बदली करण्यात आली आहे. औरंगाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अभिजीत चौधरी, अकोल्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एम. देवेंद्र सिंह, वध्र्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजय मीना, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अस्तिक कुमार पांडे, हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एम. जी. अरदाद यांची नेमणूक करण्यात आली आहे. ए. बी. उन्हाळे यांची अकोल्याला महाराष्ट्र राज्य बीज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून, तर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पी. सिवा शंकर यांची बदली करण्यात आली आहे. जव्हारचे उपविभागीय सहाय्यक जिल्हाधिकारी सुशील खोडावेकर यांची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त

म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages