पालिकेच्या करोडोंच्या बायो म्याट्रिक मशीनचा भंगार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या करोडोंच्या बायो म्याट्रिक मशीनचा भंगार

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव -
Displaying bmc bio matric mashins.jpg
मुंबई महानगर पालिकेने आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना वेळेवर कामावर उपस्थित राहावे यासाठी करोडो रुपये खर्च करून बायो म्याट्रिक मशीन लावली आहेत. पालिकेची बायो म्याट्रिक मशीन लावण्याची योजना पूर्ण पणे फेल झाली असून करोडो रुपयांच्या या मशीनचा सध्या भंगार झाला झाला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार पालिकेचे कर्मचारी अधिकारी आपल्या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नव्हते तसेच कर्मचारी विविध करणे देवून वेळे अगोदरच कामावरून घरी पळ काढत होते. कर्मचारी अधिकारी मस्टरवर सह्या करून कार्यालयात हजर नसले तरी पालिकेचा पगार मात्र घेत होते. पालिकेचे अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची कामे रखडली जात होती. या कारणाने पालिकेच्या अखत्यारीतील सर्वच कार्यालयात बायो म्याट्रिक मशीन लावण्याची योजना आखण्यात आली. सन २००७ -८ मध्ये भारत इलेक्ट्रोनिक्स या कंपनीला ४ करोड रुपयांचे मशीन लावण्याचे कंत्राट देण्यात आले. या मशिन्स पालिकेचे मुख्यालय, २४ विभाग कार्यालय, रुग्णालये तसेच इतर आस्थापना अश्या विविध ६१ ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. 

सन २००७ -८ मध्ये लावण्यात आलेल्या या बायो म्याट्रिक मशीन लावण्यात आल्या असल्या तरी कित्तेक ठिकाणी या अद्याप चालूच करण्यात आलेल्या नाहीत. कित्तेक ठिकाणी या मशीन पहिल्या दिवसापासून बंद पडल्या आहेत. यामुळे पालिकेने ज्या उद्देशाने या मशीन लावल्या आहेत तो उद्देश सफल झालेला नाही. बायो म्याट्रिक मशीनवर पालिकेने केलेले करोडो रुपयांचा खर्च सुद्धा वाया गेला आहे. मुंबईकर जनतेच्या खिश्यामधून कररूपाने जमा झालेल्या महसुलातील पैसा फुकट जात असताना, नागरिकांची कामे होत नसताना पालिकेतील सत्ताधारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

मुंबई महानगर पालिकेत बायो म्याट्रिक मशीन  ७ - ८ वर्षा पूर्वी लावण्यात आल्या असून तेव्हा पासूनच या मशीन बंद अवस्थेत आहेत. पालिका कोणालाही कंत्राट देताना त्याची शहानिशा करत नाही. यामुळेच भारत इलेक्ट्रोनिक्स या कंपनीने आपले काम योग्य रित्या केलेले नाही. हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करून दोषी लोकांवर कारवाही करायला हवी. 
देवेंद्र आंबेरकर - विरोधी पक्ष नेते  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages