मुंबई : मुंबईत ताप, मलेरिया आणि अन्य साथीच्या रोगांनी पुन्हा उचल खाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जानेवारी महिन्यात तापाचे सर्वाधिक ३ हजार २३२ रुग्ण आढळून आले. त्यानंतर गॅस्ट्रो ७६१ आणि मलेरियाच्या ३१४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
गेल्या वर्षी मुंबईत पावसाळ्यानंतर अचानक मलेरिया, डेंग्यू आणि इतर साथीचे आजार पसरले होते. यामुळे पालिकेने व्यापक प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. हिवाळ्यात विषाणूंची उत्पत्ती होण्यास अनुकूल वातावरण नसते. त्यामुळे साथीच्या रोगांना अटकाव लागेल, असा कयास वर्तवण्यात येत होता.मात्र, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांतील आकडेवारीवरून हा कयास खोटा असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर महिन्यात तापाचे साडेपाच हजार, मलेरियाचे ६0९, गॅस्ट्रोचे ८१७ आणि डेंग्यूचे ५६ रुग्ण आढळून आले. नववर्षातही साथीचे आजार कायम असल्याचे आढळून आले आहे.