संमतीने शारीरिक संबंध म्हणजे 'बलात्कार' नव्हे : हायकोर्टाचा निर्वाळा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संमतीने शारीरिक संबंध म्हणजे 'बलात्कार' नव्हे : हायकोर्टाचा निर्वाळा

Share This
मुंबई : जर एखाद्या महिलेने विवाहित परपुरुषाशी स्वेच्छेने शारीरिक संबंध ठेवले असतील तर त्या पुरुषाने लग्नाला नकार दिल्यानंतर ती महिला स्वत:वर 'बलात्कार' झाला, अशी ओरड करू शकत नाही. परस्पर संमतीने ठेवलेल्या अशा शारीरिक संबंधांना 'बलात्कार' म्हटले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात बलात्काराची तक्रार रद्दबातल ठरवली. न्यायूमर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

याचिकाकर्ती महिला ही प्रौढ आहे व तिला प्रतिवादी (पुरुष) हा विवाहित असल्याचेही ठाऊक होते, ही वस्तुस्थिती खंडपीठाने या प्रकरणात निकाल देताना विचारात घेतली. प्रतिवादी हा विवाहित असल्याचे माहीत असूनही याचिकाकर्त्या महिलेने त्याच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणात प्रतिवादीने शरीरसुखाची भूक भागवण्यासाठी लग्नाचे खोटे वचन दिल्याचे उघड होत नाही, त्याने याचिकाकर्त्या महिलेची फसवणूक केल्याचेही स्पष्ट होत नाही. उलटपक्षी, उपलब्ध पुराव्यांवरून दोघांनी परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. दोघांमध्ये समझोता झाल्याचे सांगून महिलेने स्वत: दाखल केलेली बलात्काराची तक्रार रद्द करण्याची विनंती एका याचिकेद्वारे केली होती. तिने २२ जुलै २0१४ रोजी प्रतिवादीने बलात्कार व विनयभंग केल्याचा आरोप करत कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तिच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील मत व्यक्त केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages