गोदी कामगारांना जलसमाधी देण्याचा सरकारचा प्रयत्न - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोदी कामगारांना जलसमाधी देण्याचा सरकारचा प्रयत्न

Share This
मुंबई बंदरावर काम करणाऱ्या गोदी कामगारांना जलसमाधी देऊन पोर्ट ट्रस्टच्या जागेवर श्रीमंताच्या मरीना पार्क तयार करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडुन करण्यात येत असल्याचे आरोप मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल कामगार युनिअनचे अध्यक्ष एस. के. शेटये यांनी केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परीषदेमध्ये बोलत होते. यावेळी एस. आर. अपराज, विद्याधर राणे आणि मारुती विश्वासराव यावेळी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसापासुन मुंबईच्या बंदराचा विकास करण्याचा मुद्दा गाजत आहे. आज १३ जानेवारी रोजी गोदी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी वडाळा येथे जागा मिळावी यासाठी कर्नाट बंदर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गिरणी कामगारांचा चाललेल्या हक्काच्या घरासाठी लढा हा गोदी कामगारांना प्रेणादायी ठरला असुन गोदी कामगारांनीदेखील हक्काच्या घरासाठी आंदोलन छेडले आहे. सबका साथ सबका विकास या मंत्राच्या खाली मुंबईतील बंदरांचा विकास करण्याचा ठरविण्यात आले असुन यामध्ये बंदरांची जागा बिल्डर, हॉटेलचालक यांना देण्याचा प्रयत्न सरकारकडुन करण्यात येत आहे. सरकारच्या या मंत्रामुळे हजारो गोदी कामगार बेरोजगार होणार आहे. त्याचप्रमाणे घरांच्या नावावर टिटवाळा येथे स्थलांतर जागा देत आहे. गोदी कामरांना वडाळा, कॉटनग्रीन, शिवडी यासारख्या मुंबईतच राहण्यासाठी घरे देणयात यावी त्यांना मुंबईपासुन इतर ठिकाणी   म्हणजे टिटवाळयासारख्या ठिकाणी नेऊ नये. ५० हजार गोदी कामगारांना घरे देण्यासाठी २५०  एकर जागेची गरज आहे असल्याचे शेटये यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages