रेल्वे हद्दीत पतंग उडविण्यास बंदी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे हद्दीत पतंग उडविण्यास बंदी

Share This
मुंबई : मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. परंतु आपल्या पतंगाच्या मांज्यामुळे कुणाचा तरी जीव जाऊ शकतो, याकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे पश्‍चिम रेल्वे पोलीस आयुक्त आनंद झा यांनी रेल्वे हद्दीत पतंग उडविण्यावर बंदी घातली आहे. याकडे कोणी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

पश्‍चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार या मार्गात ओव्हरहेड वायरही २५ हजार वोल्ट विद्युत प्रवाहाची आहे. त्यामुळे या मार्गावर पतंग उडवणार्‍यांना सावधानीचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. ओव्हरहेड वायरमधून २५ हजारांचा विद्युत प्रवाह प्रवाहित होत असल्यामुळे अनेकदा वीज तारांचा शॉक लागून मृत्यू होतात. पश्‍चिम रेल्वे मार्गावर पतंग जमा करण्यासाठी सध्या हातात काठी घेऊन फिरणार्‍यांची संख्या जास्त आहे. मात्र अडकलेला पतंग तारेतून काढण्याच्या नादात ओव्हरहेड वायरमधून वाहणार्‍या विजेच्या शॉककडे मात्र दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेने वांद्रा, माहीम, माटुंगा, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्‍वरी, बोरिवली, नालासोपारा, वसई रोड या स्थानकांदरम्यान विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर याकडे कोणी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या धाग्यामध्ये धातूचे कण असल्याने हा धागा ओव्हरहेड वायरच्या सान्निध्यात आला की, पतंग उडविणार्‍यास शॉक बसू शकतो. तसेच पतंगाचे धागे ओव्हरहेड वायरमध्ये गुंतल्यास शॉर्टसर्किटची भीती असते.


मध्य रेल्वेनेदेखील रेल्वेमार्गावर पतंग उडविण्यास बंदी घातली आहे. पतंग उडविणार्‍यांना हुसकावून लावण्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच रेल्वे हद्दीत पतंग उडवताना अथवा कापलेला पतंग जमा करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशाही सूचना रेल्वे पोलीस अधिकार्‍यांक डून देण्यात आल्या आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages