बम्बार्डियर लोकलची परेवर चाचणी यशस्वी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बम्बार्डियर लोकलची परेवर चाचणी यशस्वी

Share This
मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असणारी एक बम्बार्डियर लोकल पश्‍चिम रेल्वे मार्गावर दाखल झाली असून तिची चाचणी बुधवारी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले असल्यामुळे येत्या २६ जानेवारीला बम्बार्डियर लोकल परेवर धावण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी बम्बार्डियर लोकल येत्या २६ जानेवारीला पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सोमवारी दिली होती. त्यानुसार ही बम्बार्डियर लोकल पश्‍चिम रेल्वेवर बुधवारी दाखल झाली असून चर्चगेट ते वसई रोडदरम्यान तिची चाचणी घेण्यात आली. या वेळी मुख्य सुरक्षा आयुक्त चेतन बक्षीदेखील उपस्थित होते. ही चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. नोव्हेंबर २0११ मध्ये रेल्वे बोर्डातर्फे बम्बार्डियर लोकलसंदर्भात करार करण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २0१३ साली बम्बार्डियर लोकलचा नमुना सादर करण्यात आला होता. रेल्वे अर्थसंकल्पात ७२ नवीन बम्बार्डियर लोकलला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावर ३८, तर पश्‍चिम रेल्वे मार्गावर ३४ बम्बार्डियर लोकल देण्यात आल्या.मात्र या लोकल फक्त एसी विद्युत प्रवाहावरच चालत असल्याने या गाड्यांचे परीक्षण पश्‍चिम रेल्वे मार्गावरच केले गेले. बम्बार्डियर लोकलची चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता येत्या २६ जानेवारी रोजी ही बम्बार्डियर लोकल परेवर चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages