पालिकेच्या जकातीच्या मह्सुलात घट तरीही दक्षता अधिकारी पद भरण्याकडे दुर्लक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या जकातीच्या मह्सुलात घट तरीही दक्षता अधिकारी पद भरण्याकडे दुर्लक्ष

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबईमध्ये येणारया गाड्यामधून जकात चोरी होऊ नये म्हणून महापालिकेने दक्षता विभाग सुरु केला गेला आहे. सध्या जकाती मधून येणारया मह्सुलात मुंबई महापालिकेला १० ते १५ टक्के घट येत असताना पालिकेने दक्षता अधिकारी (विशेष कार्य) हे पद १ ओक्टोबर २०१३ पासून गेले १४ महीने रिक्त ठेवले असल्याने पालिकेच्या करभारावर शंका उपस्थित केली जात आहे.

मुंबई महानगर पालिकेला जो महसूल मिळतो त्यामध्ये जकाती मधून मिळणाऱ्या मह्सुलाचे प्रमाण मोठे आहे. जकाती मध्ये मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने पालिकेने आयुक्तांच्या अधिपत्याखाली १९८६ साली दक्षता विभाग सुरु केला. या विभागासाठी ३ अधिकारी आणि ८ सुरक्षा रक्षाकांची नेमाणुक करण्यात आली होती. परंतू 1 ओक्टोबर २०१३ पासून दक्षता अधिकारी (विशेष कार्य) हे पद तसेच त्या खालोखाल असलेली २ सहाय्यक दक्षता अधिकारी ही पदेही रिक्त ठेवण्यात आलेली आहे. 

उप आयुक्त राजेन्द्र वळे हे या विभागाचे प्रमुख असताना पालिकेला जकाती मधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. परंतू सध्या दक्षता विभागात अधिकारीच नसल्याने मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात जकात चोरी करून गाड्या आणल्या जात असल्याने पालिकेला १० ते १५ टक्क्याच्या मह्सुलाला मुकावे लागत आहे. पालिकेला महसूल कमी मिळत असला तरी पालिकेने ही रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

याच विभागातील एक स्टेनो आणि एक क्लार्क पैकी सध्या एकच क्लार्क कार्यरत आहे. यामुळे लोकांना आपल्या कामासाठी सतत फेरया माराव्या लागत आहेत. याच विभागातील ८ सुरक्षा रक्षकाना जकात नाक्यावर बंदिस्त कार्यालयात बसवून ठेवले जात असल्याने पालिकेला जकात चोरी पकडली जाऊ नए असेच वाटत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages