'वाय फाय' न दिल्यास लॅपटॉप,मोबाइल परत करण्याचा नगरसेवकांचा इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'वाय फाय' न दिल्यास लॅपटॉप,मोबाइल परत करण्याचा नगरसेवकांचा इशारा

Share This
महापालिका प्रशासनाने नगरसेवकांना लॅपटॉप आणि मोबाइल दिला असला तरी, अद्याप 'वाय फाय'ची सुविधा आणि 'सॅप' प्रणालीची 'कनेक्टिव्हिटी' दिलेली नाही. यामुळे 'वाय फाय' सुविधा न दिल्यास लॅपटॉप आणि मोबाइल परत करण्याचा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिला. यामुळे हादरलेल्या पालिका प्रशासनाने महापालिका सभागृहात 'वाय फाय' सुविधा येत्या आठवडाभरात देणार आहे, असे जाहीर केले. 

भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी 'सॅप' प्रणाली आणि वाय फायच्या मुद्दय़ावरून पालिका प्रशासनाला समितीच्या बैठकीत चांगलेच धारेवर धरले. महापालिकेने 'लॅपटॉप' दिले आहेत; पण त्यात सॅप प्रणाली दिलेली नाही. यामुळे हे लॅपटॉप केवळ 'गेम' खेळण्यासाठी र्मयादित राहिले आहेत. स्थायी समितीच्या आगामी बैठकीत या लॅपटॉपमध्ये सॅप प्रणाली आणि वाय फाय सुविधा दिली नाही तर लॅपटॉप परत करू, अशी धमकी कोटक यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी तर लॅपटॉपच नव्हे तर मोबाइलही परत करू, असा इशारा दिला. कोटक आणि पिसाळ यांना अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी पुढील आठवड्यात दोन्ही सभागृहांमध्ये 'वाय फाय' सुविधा सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासित केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages