महाराष्ट्रामधे शिष्यवृत्ती परीक्षेस बसणारया विद्यार्थ्याना एक हजार व १५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. ही रक्कम अत्यंत तूटपूंजी असल्याने या रकमेत शासनाने वाढ करावी अशी मागणी मुंबई महानगर पालिकेतील शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यानी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कड़े केली आहे.
महाराष्ट्रातील शालामधील ४ थी व ७ वी मधील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती परिक्षेस बसविण्यात येते. सन २००६ पासून ४ थी मधील विद्यार्थ्याना एक हजार रुपये तर ७ वी च्या विद्यार्थ्याना १५०० रुपये रुपये देण्यात येतात. ही रक्कम तूटपूंजी असून ही रक्कम हातात पड़न्यास एक वर्षाचा कालावधी लागत असतो. सन २०१४ मधे प्राथमिक विभागातील १६ हजार ६८३ आणि माध्यमिक विभागातील १६ हजार ४२८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. ४ थी साठी २ हजार रुपये व इयत्ता ७ वी साठी ३ हजार रुपये अशी शिष्यवृत्तीमधे वाढ केल्यास ४ करोड़ १३ लाख २५ हजार इतकी वाढीव तरतूद करावी लागणारा आहे. यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यानी पुढाकार घ्यावा अशी मागणी मुंबई महानगर पालिकेतील शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यानी केली आहे.
