मोफत घरपोच पास मरेच्या प्रवाशांना नको - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोफत घरपोच पास मरेच्या प्रवाशांना नको

Share This
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सुमारे २८ लाख पासधारक प्रवाशांपैकी फक्त १00 पासधारक प्रवासी ऑनलाइन पास काढण्याच्या सुविधेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पास घरपोच पोहचवण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे २0-३0 रुपये शुल्क घेतले जात होते. मात्र, वर्षभरानंतर ऑनलाइन पास या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेने मोफत घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली; परंतु मोफत घरपोच सेवा देण्यास सुरुवात केल्यानंतरच प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.

मध्य रेल्वेने आयआरसीटीसीच्या मार्फत ऑनलाइन पास सेवा २00६ मध्ये सुरू केली होती. ही सेवा सुरू केल्यानंतर वर्षभरातच मध्य रेल्वेच्या २८ हजार पासधारकांपैकी ७ हजारांपेक्षा जास्त पासधारकांनी या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन पास काढल्यानंतर हा पास थेट घरी येत असल्याने प्रवाशांनी रांगा लावण्याऐवजी हा पर्याय निवडण्यास सुरुवात केली. पास घरी पोहचवण्यासाठी मध्य रेल्वेने शुल्कही आकारले होते. प्रथम दर्जाचा पास पोहचवण्यासाठी ३0 रुपये तर द्वितीय श्रेणीचा पास पोहचवण्यासाठी २0 रुपये शुल्क आकारले जात होते. या योजनेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा, या विचाराने मध्य रेल्वेने पास घरपोच पोहचवण्यासाठी शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला. २00७ पासून ऑनलाइन पास मोफत घरपोच पोहचवण्याची सेवा सुरू केली. मात्र, या मोफत योजनेमुळे ऑनलाइन पास प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत गेला. रेल्वेने मोफत घरपोच पास सेवा देण्यास सुरुवात केल्यानंतर बहुधा प्रवाशांच्या मनात या योजनेबद्दल प्रश्न निर्माण झाले असावेत, असा अंदाज मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त क रतात. या ऑनलाइन पास सेवेची जाहिरात करण्यात रेल्ेव प्रशासन अपयशी ठरले. मात्र, आता तरी या योजनेची जास्तीत जास्त माहिती प्रवाशांपर्यंत पोहचवल्यास सुमारे २८ लाख पासधारक प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे. मात्र, मध्य रेल्वेकडे त्याविषयी कोणतीही ठोस योजना नाही.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages