मुंबई : मुंबईचा विकास करतानाच मुंबईच्या आसपासच्या क्षेत्राचाही आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकास करण्यात येईल. 'मुंबई नेक्स्ट' या संकल्पनेच्या माध्यमातून मुंबईचा जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास करण्यात येईल व येत्या काही वर्षांतच मुंबई महानगर प्रदेशाचा कायापालट करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई शहरासोबतच मुंबईच्या आसपासच्या प्रदेशाचाही विकास होत आहे. या प्रदेशातही पायाभूत सुविधांचा अधिक विकास केल्यास मुंबई ही जागतिक आर्थिक केंद्र म्हणून उदयास येईल. जगातील अनेक कंपन्या मुंबईत आर्थिक गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या माध्यमातून मुंबईसाठी मुंबई नेक्स्ट हे पाऊल उचलण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फस्र्टचे सहकार्य घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई महानगराचा पुढील काळात कसा विकास करायचा यासाठी ६ फेब्रुवारीला एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबई नेक्स्टच्या बोधचिन्हाचे सह्याद्री अतिथीगृह येथे अनावरण केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुंबई फस्र्टचे अध्यक्ष नरिंदर सिंग, खा. पूनम महाजन, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते.
मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व त्यासाठी कराव्या लागणार्या उपायययोजना यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री जयंती सिन्हा, टाटा ग्रुपचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, आमिर खान यांचा समावेश राहणार आहे. राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देसाईदेखील या कार्यक्रमास उपस्थित राहतील. जागतिक बँक तसेच युरोपियन शिष्टमंडळही या वेळी उपस्थित राहणार आहे.