डेंग्यू मलेरिया रोखण्यासाठी फेंगशुई, मनीप्लांट, प्लास्टिक प्लेट्सवर बंदी घालावी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डेंग्यू मलेरिया रोखण्यासाठी फेंगशुई, मनीप्लांट, प्लास्टिक प्लेट्सवर बंदी घालावी

Share This
फेंगशुई, मनीप्लांट, झाडांच्या कुंडीखाली वापरले जाणाऱ्या प्लेट्स तसेच प्लास्टिकमध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये डेंग्यू व मलेरियाचे डास मोठ्या प्रमाणात पैदा होत असतात. या सर्वांवर बंदी घालण्याचे अधिकार पालिकेला नसल्याने राज्य सरकारने बंदी घालायला हवी असे मत मुंबई महानगर पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारंग्रेकर यानी व्यक्त केले आहे.
मुंबईमध्ये काही वर्षापूर्वी मलेरियाचे थैमान घातले होते त्यावेळी ७६७४५ लोकांना याची लागन होऊन १४५ लोकांचा मृत्यु झाला होता. या नंतर आता डेंग्यूने थैमान घातले आहे. पालिकेने १७९०४ लोकाना सूचना पत्रे, १८८५ लोकाना ताकीद पत्र, तर १२१५ लोकांवर खटले दाखल केले असून ३२ लाख ५१ हजार रुपयांचा दंड पालिकेने वसूल केला आहे. मुंबईची लोकसंख्या आणि दोन तीन माळ्यांच्या उभ्या राहिलेल्या झोपड्या यामुळे डेंग्यू नियंत्रण करण्यात अड़चण येत असल्याचे  नारंग्रेकर यानी सांगितले. 

सन २०१५ मधे प्रत्तेक विभागात स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. या स्वयंसेवकाना डेंग्यू आणि मलेरिया इत्यादी आजाराना कारनीभूत असलेल्या डास, डासांच्या आळ्या यांची माहिती दिली जाणार आहे. तसेच स्वछतेबाबत प्रशिक्षण दिले जाऊन मुंबई मध्ये सर्वत्र जनजागृती केली जाणार असल्याचे नारंग्रेकर यानी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages