पालिकेच्या मार्केट साठी राखीव जागा मधे भ्रष्टाचार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या मार्केट साठी राखीव जागा मधे भ्रष्टाचार

Share This
मुंबई / प्रतिनिधी 
मुंबई महानगर पालिकेमधील सत्ताधारयानी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या प्रस्तावामुले डी विभाग येथील मार्केट साठी राखीव ठेवलेल्या भूखंडा मधे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नगरसेवक मोहसीन हैदर यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

मुंबई महानगर पालिकेने विकास आराखडयात भुमापन क्रमांक ४१,४२, २८४ तीन भूखंड रिटेल मार्केट साठी राखीव ठेवण्यात आले होते. यापैकी भुमापन क्रमांक ४२ हा विकास नियंत्रण नियमावली क्रमांक ३३ (७ ) नुसार विकसित करण्यात आला होता. यामधे मार्केटसाठी १५ टक्केच जागा उपलब्ध झाली आहे. ४१ व २८४ हे भूखंड मूल मालकाकडून पालिकेने घ्यावा तेथील रहिवाश्यांचे पुनर्वसन करावे व उरलेल्या जागेवर रिटेल मार्केट उभारावे अशी मागणी हैदर यानी केली आहे. या दोन्ही भूखंडाचे पुनर्वसन करण्यासाठी २००६ मधे भूसंपादन अधिकारयाकड़े प्रकरण पाठवले असून त्यासाठी ७ कोटी ४५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पालिकेतील सत्ताधारयानी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या प्रस्तावामुले १६६.३० टक्के जागा उपलब्ध होणार आहे. पालिकेने या भूखंडावर विकास केल्यास ४ एफएसआय प्रमाणे ४४३४.८० चौरस मीटर जागा उपलब्ध होऊ शकते.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages