मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १८00 एकर जमिनीचा विकास करण्यासाठी माजी अध्यक्षा राणी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती कामगारांना विश्वासात न घेताच केली असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्ट विकास गोदी कामगारांनी स्पष्ट केले असून कामगार हिताचे रक्षण करणारे विकास समितीत कोणीही नाही. त्यामुळे बीपीटीच्या गोदी कामगारांना घरांसाठी जागा न दिल्यास आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते अँड़ एस. के. शेट्ये यांनी दिला. मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने कर्णाक बंदर येथे बंदर व गोदी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मुंबई पोर्ट ट्रस्ट जमिनींच्या विकासात कामगारांचे स्थान काय? त्याबाबत कोणीही काहीही बोलत नाहीत. मात्र, मुंबई शहरात परदेशी पर्यटकांना विचारात घेऊन मुंबई बंदराच्या जागेचा विकास करताना हॅलिपॅड, प्लोटिंग हॉटेल्स, मरिना पार्क, गार्डन्स असे नवे प्रकल्प बांधण्याचे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केले. सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ११ हजार ५00 कामगार व ३६ हजार पेन्शनर्सचा विस्थापित करण्याचा डाव असल्याचे कामगार नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. बीपीटीच्या जागेवर असलेल्या ३0 हजार झोपडपट्टीधारकांना एसआरए योजनेच्या आधारे घरे देता येतात मग कामगारांना का नाही, असा सवाल करत बंदर व गोदी कामगारांना घरासाठी जागा द्यावी, अशी मागणी स्व. डॉ. शांती पटेल यांनी केल्यानंतर विश्वस्तांच्या बैठकीत ठराव मंजूर झाला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १२२ एकर कुलाबा, वरळी, कॉटनग्रीन, शिवडी, वडाळा, वाडी बंदर, माझगाव, रे रोड येथे कामगारांच्या वसाहती आहेत, तर ५0 हजार गोदी कामगारांना घरे बांधण्यासाठी २५0 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून विकासामध्ये १२८ एकर जागा घरे बांधण्यासाठी अधिक लागणार आहे. गोदी कामगारांना हक्कांच्या घरासाठी वडाळा येथे जागा मिळावी, या मागण्या करण्यात आल्या आहे.
या मेळाव्यात महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष हनुमंत ताटे, यांनी एसटी कामगारांतर्फे गोदी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांनी गिरणी कामगारांतर्फे गोदी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या वेळेस पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने व पदाधिकारी उपस्थित होते.