पर्यटनश्रेत्र बनविण्यासाठी मिठी नदीला पूर्वीसारखी बनविणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पर्यटनश्रेत्र बनविण्यासाठी मिठी नदीला पूर्वीसारखी बनविणार

Share This
मुंबई (प्रतिनिधी)- मिठी नदीपात्रात सोडण्यात येणारे प्रदूषीत सांडपाणी, दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या झोपड्यांमुळे नदीचा श्वास कोंडत आहे. या कोंडमाऱ्यातून सुटका करण्यासाठी नदीची सुटका करून मिठी नदीला पर्यटन क्षेत्र बनविण्यात येणारआहे. त्यासाठी येत्या दहा दिवसात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करावी, असे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पालिका, एमएमआरडीए आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.यावेळी झोपडपट्टीदादाव स्थानिकगुंडांनी कामात अडथळा आणल्यास त्यांची गठडी बांधा, अशा सूचना त्यांनीया वेळी केल्या.

मुंबई मध्ये२६जूलै रोजी पूरस्थिती काळात मिठी नदीमुळे वित्तीय हानी झाली होती.त्यामुळे काही प्रमाणात संरंक्षण भींती बांधण्यात आल्या होत्या.मात्र, नदी वरील वाढत्या झोपड्या आणि व्यासाय करणाऱ्या कंपन्याकडून नदी पात्रात सांडपाणी सोडले जात आहे. परिणामी, प्रदूषण निर्माण होत आहे. त्यामुळे नदीला पर्यावरण क्षेत्र बनविण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मिठी नदी पहाणी दौरा आयोजित केला होता.माहिम कॉजेवे येथून पाहणीला सुरूवात झाली. वाकोला पूल, एमटीएनएल, सीएसटी कुर्ला पूल, सफेद पूल, टॅक्सीमन कॉलनी आदी ठिकाणची पाहणी केली. 

नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर मलनिःस्सारण प्रक्रिया करून ते थेट समुद्रात खोलवर सोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तब्बल ४० ठिकाणाहून सांडपाणी नदी पात्रत सोडले जात आहे.तसेच अधिकृत-अनधिकृत झोपड्यांनी वेढले असून अधिकृत झोपड्यांना पर्यायी घरे दिली जाणार आहेत. तर, अनधिकृत झोपड्यांवर कायदेशीर कारवाई करावी.याकरिता पोलिसांची मदत घ्यावी, असे आदेश पालिका, एमएमआरडीए आणि जिल्हाधिकारी यांना दिले. तसेच टॅक्सीमन कॉलनीवरील पात्राचे रुंदीकरणकरण्यासाठी अनधिकृत मदरसा त्वरीत २ दिवसात हलविण्याची सूचना केली

दरम्यान, मिठी नदीचे खोलीकरण,रुंदीकरण, पात्रातील गाळ काढणे, संरक्षण भींत बांधून त्या ठिकाणहून सर्व्हिसरोड तयार केला जाणार आहे. आतापर्यंतच्या कामांपैकी ७० टक्के कामे एमएमआरडीए आणि पालिकेकडून करण्यात आली असून उर्वरित ३०टक्के कामे शिल्लक आहेत. ही कामे ही येत्या पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारआहेत. त्यामुळे मिठी नदीचे सौदर्य पाहण्यासाठी सिंगापूरचे लोक मुंबईत बघायला मिळतील अशी, ग्वाही दिली.
४५०झोपड्यांवर कारवाई निश्चित
इस्तम नगरआणि पंचशीलनगरातील ४५० झोपड्यांवरनिश्चित कारवाईकेली जाणारआहे.त्यासाठी सबंधितझोपड्यांना नोटीसदेऊन त्यांचेफोटो काढावे.तसेचपोलिसांची मदतघेऊन झोपड्यांवरकारवाई करण्याचे आदेश दिले.
दहा महिन्यात कारंजे उडणार
मिठी नदीच्या किनाऱ्या लगत दुर्तफा असलेली बांधकामे, झोपड्या, गाळ, आणि झोपड्यातील सांडपाणी काढल्यामुळे नदीला स्वच्छता दिसून येईल.या स्वच्छते मध्ये दहा महिन्यात कारंजे उडताना पहायला मिळतील असा दावा कदम यांनी केला.
माजीआमदार मंत्र्यामुळे अनधिकृत बांधकामे वाढली
मिठी नदी परिसरातील अनधिकृत झोपड्या वाढण्यास माजी आमदार आणि मंत्री महोदय कारणीभूत असल्याचा आरोप कदम यांनी नसीम खान आणि नवाब मलीक यांचे नाव न घेता केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages