म्हाडाच्या मुंबई बेटावरील जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाअंतर्गत दुरुस्ती मंडळाला मिळणार्या सरप्लस एरिया न देणार्या विकासकांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली असून लवकरच या विकासकांची बँक खाती गोठविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मात्र या प्रक्रियेसाठी आवश्यक ती बँकेच्या खात्यांची माहितीच म्हाडाकडे नसल्याने म्हाडासमोर पेच उभा राहिला आहे.
म्हाडाने मेसर्स पारस एंटरप्रायझेस, द बलवास इस्टेट को-हौ. सो., आय. ए. पारेख, सी. एस. नाडकर्णी, मेसर्स स्नेहा बिल्डर्स, हरिश दामजी निशार, नलिनकुमार एम. शहा अँण्ड ब्रदर्स, मोहम्मद कलीम शेख अँण्ड फरेद अहमद खान, मेसर्स गायत्री एंटरप्रायझेस, डायरेक्टर संघवी इस्टेट अँण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, सिमीओ बिल्डर्स, मेसर्स सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, श्रेयस अँण्ड अशोक नारायण पाठारे या सरप्लस न देणार्या विकासकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तर २९ मधील या १२ वगळता उर्वरित विकासकांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सरप्लस एरिया न देताच म्हाडाची घरे लाटण्याचा प्रयत्न अंदाजे ३३ विकासकांकडून सुरू आहे. या विकासकांनी सरप्लस एरिया द्यावा यासाठी मंडळ अनेक वर्ष पाठपुरावा करत आहे, मात्र नोटीस पाठवूनही उत्तर मिळत नाही किंवा न्यायालयीन लढाई लढावी लागते त्यामुळे आता अखेर अंतिम कारवाई करण्यासाठी म्हाडाने कंबर कसली असून विविध कारवाया करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.