अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
मुंबई / प्रतिनिधी
राज्य सरकार कडून मुंबई महानगर पालिकेला मिळालेल्या संगणकाचे पैसे पालिकेने खर्च केले नसल्याने संबंधित शिक्षण विभागातील अधिकारयांवर करवाई करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे गतनेते रइस शेख यानी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीत केली आहे.
शासनाच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत अल्पसंख्यांक मुलांच्या शिक्षणासाठी सन २०१३ - १४ मधे मुंबई महानगर पालिकेने चालवलेल्या १२ उर्दू माध्यमांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये संगणक पुरवठा करण्यासाठी २७. १२ लाख रुपये मंजूर केले होते. परंतू पालिकेने मार्च २०१३ पर्यंत हा निधी खर्च केलेला नाही. याबाबत कोणताही अहवाल पालिकेने शासनाच्या शिक्षण विभागाकडे पाठवलेला नसल्याने शिक्षण उप संचालक मुंबई विभाग यानी १२ सप्टेम्बर २०१४ला पालिकेच्या शिक्षण अधिकारयांना पत्र पाठवून हा निधी खर्च केला नसल्यास निधी परत करावा असे कळवले आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागाने हा निधी वेळेवर खर्च केला असता तर पालिकेच्या १२ उर्दू माध्यमातील गरीब मुलाना याचा फायदा झाला असता. परंतू पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्याना याचा फायदा मिळू शकलेला नसल्याने उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याने संबंधित अधिकारयांवर कारवाई करावी अशी मागणी रइस शेखयांनी केली आहे.
