केईएममधील 'निओनॅटल' कक्ष अत्याधुनिक होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केईएममधील 'निओनॅटल' कक्ष अत्याधुनिक होणार

Share This
मुंबई : मुदतपूर्व प्रसूती झालेल्या नवजात बालकांची प्रकृती अत्यंत नाजूक असते. त्यांच्या जीवाची खूपच काळजी घ्यावी लागते. एखाद्या बालकात जन्मत:च आजार असल्यास त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. केईएम रुग्णालयात अशा बालकांसाठी 'निओनॅटल' कक्ष असून तो आणखी अत्याधुनिक होणार आहे. 

यासाठी 'माझगाव गोदी'ने (एमडीएल) या कक्षासाठी ३ कोटी ८ लाख रुपये निधी दिला आहे. या निधीमुळे तेथे आणखी तीन खाटा आणि जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर्स) वाढणार आहे. जसलोक, बॉम्बे हॉस्पिटल आदी मोठय़ा रुग्णालयांत या उपचारांसाठी १0 लाखांपर्यंत खर्च येतो; पण केईएममध्ये यासाठी कमी खर्च येणार असून आतापर्यंत या कक्षात जन्मत:च ६00 ते ७00 ग्रॅम वजनांच्या नवजात बालकांनाही संजीवनी मिळाली आहे. शिवाय या रुग्णालयात डायलिसीस सुविधा सुरू करण्यासाठी महापालिकेने 'एनटीपीसी'शी २ जानेवारी २0१५ रोजी सामंजस्य करार केला आहे. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात अवयव दान आणि अवयव रोपणाचा विनामूल्य प्रकल्पही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित या सेवासुविधा नियोजन आणि नागरी दारिद्रय़ निर्मूलन कक्षातर्फे सुरू करण्यात येणार आहेत, असे प्राची जांभेकर यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages