पूर्व उपनगरांतून बारा बोगस डॉक्टरांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पूर्व उपनगरांतून बारा बोगस डॉक्टरांना अटक

Share This
मुंबई : मुंबई आणि उपनगरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून पूर्व उपनगरांत केलेल्या पोलिसांच्या कारवाईत १२ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या बोगस डॉक्टरांविरोधात मुंबई पोलीस कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.


शहरात बोगस डॉक्टर बेकायदेशीररीत्या क्लिनिक्स उघडून रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवितास धोका पोहोचवत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह आरोग्य विभागाचे अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या पूर्व उगनरांतील बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरू केली. एक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी असलेली एकूण २३ पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी एकाच वेळी पूर्व उपनगरांत धाडसत्र सुरू केले. शिवाजीनगर ८, आर.सी.एफ. २ आणि मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ अशा एकूण १२ बोगस डॉक्टरांना विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. बोगस डॉक्टरांविरोधातील ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages