पुढील आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेचे जकात उत्पन्नाचे 'दरवाजे' कायमचे बंद होणार आहेत तसेच एप्रिल २0१६ पासून 'गुडस् अँड ट्रान्सपोर्ट टॅक्स'चा (जीएसटी) मुंबईकरांवर २२ ते २३ टक्के बोजा पडणार आहे, अशी माहिती पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली.
मुंबई पालिकेला जकातीमुळे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. जकात ही पालिकेचा आर्थिक कणा असल्याने, त्याच्या आधारे नव्या आणि जुन्या प्रकल्पांसाठी भरीव आर्थिक तरतूद करता येते. पण 'जीएसटी' लागू झाल्यानंतर त्यातून मिळणारे सर्व उत्पन्न राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे. पालिकेच्या विविध योजना आणि प्रकल्पांसाठी लागणारा निधी राज्य सरकारकडून मागावा लागणार आहे, असेही फणसे म्हणाले. यामुळे जकात पुढील वर्षी कायमची रद्द होणे पालिकेच्या दृष्टीने आणि जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे मुंबईकरांवर या कराचा २२ ते २३ टक्के बोजा पडणेही योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.