धर्माच्या नावाखाली राज्यांचा भेदभाव अयोग्य - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धर्माच्या नावाखाली राज्यांचा भेदभाव अयोग्य - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

Share This
मुंबई / प्रतिनिधी
 धर्मनिरपेक्षतेबाबतीत राज्याचा विचार केला तर राज्याला कोणताही स्वत:चा धर्म नसतो त्यामुळे धर्माच्या नावाखाली राज्यांचा असा भेदभाव करणे योग्य नसल्याचे सांगत धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऽया पक्षांना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या पध्दतीने डोस दिला आहे. धर्म, जात किंवा पंथ यावरुन कोणत्याच राज्याचे मूल्यमापन केले जाऊ शकत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.  उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी मंगळवारी विल्सन महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध मुद्यांवर  विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपराष्ट्रपतींनी यावेळी उत्तरे दिली.

या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींसह राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे उद्योगमंत्री  सुभाष देसाई आणि इतर प्रार्चाय यावेळी उपस्थित होते. १८३२ मधील या महाविद्यालयाचे संस्थापक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जॉन विल्सन यांच्या कार्याची माहिती असणाऽया डीव्हीडीच्या संचाचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.
देशात काही पक्ष हे जातीचे राजकारण करुन आपले अस्थित्व टिकविण्याचा किंवा आपण त्यांचे कैवारी असल्याचे सागंण्याचा प्रयत्न करत आहे त्याचप्रमाणे तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे अशा पक्षांना चांगला सल्ला घेता येईल असे भाषण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी यावेळी केले. 
ते यावेळी म्हणाले की, आपण धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ कसा घेतो, यावर सर्वकाही अवलंबून आहे. याविषयी तात्विक, पुस्तकी किंवा लेखी आणि प्रात्यक्षिक अशा सर्वप्रकारने वाद घालता येऊ शकतात. असे सांगत अन्सारी यांनी धर्मनिरपेक्ष या शब्दावर प्रकाश टाकला. तात्त्विक मुद्दे हे पाश्चिमात्य विचारांवर आधारलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात आपण ज्या समाजात  राहतो, त्यामध्ये प्रत्येकाच्या आस्था वेगवेगळया आहेत. या सर्वांना एकत्रित ठेवण्याची गरज हेच मोठे आव्हान आहे. असल्याचे अन्सारी यांनी यावेळी सांगितले.

उपराष्ट्रपती अन्सारी यांनी महिला सशक्तीकरण आणि राज्यघटनेचे धडे विद्यार्थ्यांना दिले. राज्यघटनेच्या भावनेशी प्रत्येकांने निष्ठावान आणि प्रमाणिक राहाणे हे आपले कर्तव्य आहे. देशात जिथे ४,६॰॰ विविध समाज वास्तव्य करतात, त्या देशात निवासव्यवस्था हे मोठे आव्हान असुन लोकांमध्ये जात, धर्म, वर्ण यावरुन भेद न करता त्यांना समान कायद्याने तोलले पाहिजे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages