मुंबई : वरळी येथील 'सुखदा' आणि 'शुभदा' या उच्चभ्रू वसाहतीतील काही आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, आमदार व नेत्यांनी येथील सदनिकेत केलेल्या बेकायदा बांधकामांवर अखेर १0 फेब्रुवारी रोजी महापालिकेचा 'हातोडा' पडणार आहे. ही अनधिकृत बांधकामे तत्काळ हटवण्याची सूचना सोसायटीच्या कार्यकारिणीला देऊनही ती न हटवल्यामुळे पालिका कारवाईचा बडगा ११ जणांच्या विरोधात उगारणार आहे.
'सुखदा' आणि 'शुभदा'मध्ये आजी-माजी मंत्री, आमदार, विविध पक्षीय नेत्यांनी आपापल्या घरांत, दुकानांमध्ये अंतर्गत बदल करून कार्यालये, व्यायामशाळा व अन्य बांधकाम केले होते. ही बाब पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित मंत्री, खासदार, आमदार व नेत्यांना पालिकेने यापूर्वी 'एमआरटीपी' कायद्यानुसार नोटिसा बजावून ही बांधकामे काढण्याचे आदेश दिले होते. पण त्यांच्यापैकी काहींनी न्यायालयात धाव घेऊन, त्यावर स्थगिती आणण्याचा तर काहींनी ही बांधकामे दंड भरून नियमित करण्याची तयारीही न्यायालयात दाखवली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री पतंगराव कदम, अनिल देशमुख, त्यांचे चिरंजीव सलील, माजी केंद्रीय मंत्री शिवाजी पाटील, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा डांगे, माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील, रणजित देशमुख आदींनी बेकायदा बांधकामे केल्याची तक्रार अमित मारू यांनी केल्यानंतर या प्रकरणी पालिकेने चौकशीला सुरुवात केली होती. ही कारवाई करताना विरोध होणार असल्याचे गृहित धरून महापालिकेने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.