मुंबई - मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्यातील विविध प्रकल्पांसाठी 11,441 कोटींचा मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मागितलेला निधी देण्यास रेल्वे मंत्रालय तयार असल्याने आज (ता. 26) मांडल्या जाणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास पनवेल-कर्जत मार्गाचे दुपदरीकरण, विरार ते डहाणूदरम्यान तिसऱ्या-चौथ्या मार्गाचे काम, कल्याण-वाशी रेल्वेमार्गातील महत्त्वाचा टप्पा असलेला ऐरोली-कळवा उड्डाण मार्ग प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. रेल्वेमार्गातील तांत्रिक सुधारणा, लोकलची संख्या वाढवण्यासाठी नवे डबे, स्थानकांतील सुधारणा हे प्रश्नही यामुळे मार्गी लागतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईसाठी एसी लोकल, कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाची घोषणाही अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.
विरार-डहाणू मार्गावर तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग टाकण्यासाठी दोन हजार 24 कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात या प्रकल्पाची किंमत एक हजार 561 कोटी होती. पनवेल-कर्जत या 60 किमी मार्गाच्या दुपदरीकरणासाठी तीन हजार 555 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत दोन हजार 558 कोटी रुपये होती. या प्रकल्पातून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील शेवटचे स्थानक असलेले कर्जत आणि हार्बर मार्गावरील शेवटचे स्थानक असलेले पनवेल जोडले जाईल. सध्या हा मार्ग एकेरी आहे. त्यावरून मालवाहतूक होते आणि प्रगती एक्स्प्रेस धावते. पनवेलजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याने या भागात प्रवाशांची संख्या वाढत जाणार आहे. ठाणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी कल्याण-वाशी मार्ग प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत ऐरोली-कळवा हा आठ किलोमीटरचा उड्डाण मार्ग बांधला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळण्याचा सोपस्कारही अर्थसंकल्पात पार पाडला जाईल.

मुंबईत रेल्वे अपघातात दरवर्षी हजारो प्रवासी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पादचारी पूल, सरकते जिने आदी सुविधा वाढविण्यात येणार आहेत. मुंबईतील 12 उपनगरी रेल्वेस्थानकांवर हे उपाय योजले जातील. त्यासाठी आणि अन्य तांत्रिक कामे, नवीन डब्यांसाठी दोन हजार 964 कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.