मुंबई - मुंबईमधील इमारतीच्या गच्चीवरील हॉटेल्सना परवानगी देण्याचा प्रस्ताव बुधवारी पालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत भाजपने कॉंग्रेसच्या मदतीने हाणून पाडला. शिवसेनेने या प्रस्तावाला पाठिंबा दिला असताना भाजपने विरोध केला. गच्चीवरील हॉटेलला विरोध दर्शवताना मुंबईतील नाईट लाईफला आपण विरोध करू असा संदेशही भाजपने यातून शिवसेनेला दिला आहे.
समाजवादी पक्षाचे फरहान आझमी यांनी गच्चीवरील हॉटेलना अधिकृत करण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला होता. त्यानुसार प्रशासन अशी हॉटेल्स अधिकृत करून त्यातून महसूल मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफच्या संकल्पनेसाठी हा प्रस्ताव अनुकूल असल्याने शिवसेनेने त्याला पाठिंबा देण्याची तयारी केली होती; मात्र शिवसेना आणि भाजपामध्ये सध्या शीत युद्ध सुरु आहे. भूमीअधिग्रहण विधेयकावर शिवसेनेने देशात रान पेटवण्याचे जाहीर केले असतानाच सेनेचे नाक दाबण्यासाठी सुधार समितीमधील प्रस्ताव महिलांची सुरक्षा, ट्राफिक, ध्वनी प्रदूषण इत्यादी कारणे देत नामंजूर केला आहे. प्रस्तावाच्या बाजूने शिवसेना आणि समाजवादी पक्षाने दहा मते टाकली; तर भाजप कॉंग्रेससह, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोधात मतदान करून या प्रसातावाच्या विरोधात ११ मते टाकून हा प्रस्ताव हाणून पाडला आहे.