आरटीइ अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 27 फेब्रुवारी पासून - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरटीइ अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 27 फेब्रुवारी पासून

Share This
मुंबई । अजेयकुमार जाधव
आर टी ई अंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकांना 25 टक्के राखीव कोट्यातुन शाळेमध्ये प्रवेश देण्या बाबत राज्य सरकारच्या वेबसाईट मध्ये टेक्नीकल त्रुटी असल्याने 24 तारखेपासून सुरु होणारी प्रवेश प्रक्रिया आता 27 फेब्रुवारी पासून सुरु केली जाइल अशी माहिती मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यानी दिली.

मागील वर्षी आर टी इ अंतर्गत 8 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात पालिका अपयशी ठरली होती. यामुळे या वर्षी फ़क्त 7500 विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार आहे. आर टी इ अंतर्गत शाळांची नोंदणी करण्याला शाळांकडून प्रतिसाद दिला जात नसल्याने आता पर्यंत मुंबई मधील फ़क्त 306 शाळा प्रवेश प्रक्रिये साठी पुढे आल्या आहेत. शाळांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आद्याप शाळांची नोंदणी सुरु असल्याचे शेलार यानी सांगितले.

25 टक्के प्रवेश प्रक्रिया 3 टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 27 फेब्रुवारी पासून 18 मार्च पर्यन्त राबवला  जाणार आहे. पहिल्या टप्याची लॉटरी 19 मार्च ला काढली जाणार आहे. पालिकेने प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून 24 वार्ड मधे 24 हेल्पसेन्टर सुरु केले आहेत. या हेल्पसेन्टर मधील शिक्षण विभागातील अधिकारी पालकांच्या सेवेसाठी कार्यरत असतील अशी माहिती शेलार यानी दिली.

मागील वर्षी मुंबईतल्या एकूण 312 शाळांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली. पण यंदा त्यातल्या काही शाळांनी अल्पसंख्याक दर्जा घेतल्यानंतर ही संख्या 306 पर्यंत खाली आली आहे. शाळांची नोंदणी 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. पण पहिल्या दिवशी संकेतस्थळच सुरू झाले नाही. मागील आठवड्यात दोन सार्वजनिक सुट्ट्याही होत्या. परिणामी अद्याप तब्बल 50 ते 60 शाळांनी नोंदणी केली नसल्याची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया आता शुक्रवारपासून सुरू होणार आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages