सीआरझेड च्या जमिनी आणि त्या अंतर्गत होणारी विकासकामांचा मुद्दा आज ईशान्य मुंबईचे खासदार डॉ.किरीट सोमैया यांनी लोकसभेत मांडला. दक्षिण मुंबईतील परिसरहा बंदराच्या बाजूचा असल्याने त्या जवळील विकास कामांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे बंदरया संकल्पना स्पष्ट करावी अशा मागणी ताराकिंत प्रश्नाच्या माध्यमातून डॉ.सोमैया यांनी केली.
याबाबत उत्तर देताना पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, बंदरांच्या विकासाबाबात शैलेश नाईक समितीचा रिपोर्ट तयार झाला असून त्याबाबत मुंबईच्या खासदारांसोबत याच आठवड्यात बैठक घेऊन या परिसराच्या विकासाबाबत विचार विनिमय करण्यात येईल. या व्यतिरिक्त मॅनग्रोव्हच्या संरक्षणा बाबत आणि त्या जमिनींवर होणा-या अतिक्रमणां बाबतही केंद्र सरकार विशेष लक्ष देत असून याबाबत राज्य सरकार बरोबरही बोलणी सुरु असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
