मुंबई - कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. गाडी किंवा रेल्वे हद्दीतील समस्या, तसेच धोक्याविषयी माहिती देण्यासाठी प्रवासी 9004470730 या क्रमांकावर रेल्वे सुरक्षा दलाशी (आरपीएफ) प्रवासी संपर्क साधू शकतात. 9004470700 या क्रमांकावर एसएमएस पाठवता येतील. टोल फ्री चौकशी 18002331332 या क्रमांकावर रेल्वेगाड्यांच्या धावत्या स्थितीविषयी माहिती मिळेल; मात्र ही चौकशी फक्त रोहे ते कर्नाटकमधील ठोकूरपर्यंतच्या गाड्यांविषयी करता येईल.
139 या क्रमांकावर ट्रेनची माहिती मिळेल. कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांना टोल-फ्री क्रमांक 18002665725 वर तक्रारी नोंदवता येतील. नंबर डायल केल्यानंतर प्रवासी स्वतःच्या आवाजात तक्रार ध्वनिमुद्रित करू शकतात.

ज्येष्ठ नागरिक 9664044456 वर तिकिटाचा पी.एन.आर. क्रमांक, डबा क्रमांक व आसन क्रमांक ही माहिती प्रवास सुरू करण्याच्या चार तास आधी एसएमएस करून मिळवू शकतात. सध्या ही सेवा चिपळूण, रत्नागिरी, थिविम, करमाळी व मडगाव या स्थानकांवर आहे.
अपंग प्रवाशांच्या मदतीसाठी एक सहायक व एक व्हीलचेअर डब्यापासून स्थानकातून बाहेर पडेपर्यंत मोफत पुरवली जाईल. अपंग प्रवाशांनी 9664044456 या क्रमांकावर तिकिटाची माहिती एसएमएस केल्यावर ही सुविधा मिळेल.