पालिकेतील 28 हजार सफाई कामगारांना आता हक्काचे घर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेतील 28 हजार सफाई कामगारांना आता हक्काचे घर

Share This
28 हजार कामगारांना फडणवीस सरकारची भेट 
मुंबई - मुंबई महापालिकेतील 28 हजार सफाई कर्मचाऱ्यांना ते राहत असलेल्या जागेतच स्वत:च्या मालकी हक्काने घर देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचारी विकास महासंघाचे अध्यक्ष आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या शिष्टमंडळासमोर फडणवीस यांनी ही घोषणा केली. 


महासंघाने सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांची मागणी सातत्याने केली. विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर अधिवेशनात शेलार आणि गिरकर यांनी हा प्रश्न मांडला होता. फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यासाठी आवश्‍यक त्या बाबी पूर्ण करून सरकारने अंतिमतः सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची आज घोषणा मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासमोर केली. मुंबईत कामगारांच्या 39 वसाहती असून, त्यांना चार "एफएसआय‘ देण्यात येणार आहे. या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कायदेशीर प्रक्रियादेखील तातडीने सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages