मुंबई - विविध मालांच्या रेल्वेद्वारे होणाऱ्या वाहतुकीच्या दरांमध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज वाढ केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
संसदेत आज सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात 12 वस्तूंच्या रेल्वेने होणाऱ्या मालवाहतुकीसाठी 0.8 टक्के ते 10 टक्के वाहतूकदरांत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे युरिया खताच्या वाहतुकीच्या दरातही 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे युरियाच्या किमती कायम ठेवण्यासाठी युरियासाठी दिल्या जाणाऱ्या अंशदानामध्येही वाढ करावी लागणार आहे. या सबसिडीमध्ये एकूण 300 कोटी रुपयांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सिमेंट, कोळसा, लोखंड, पोलाद, धान्ये व डाळी, भुईमुगाचे तेल, एलपीजी व केरोसिन यांच्या मालवाहतुकीच्या दरांत अनुक्रमे 2.7 टक्के, 6.3 टक्के, 0.8 टक्के, 10 टक्के, 2.1 टक्के, 0.8 टक्के व 0.8 टक्के वाढ करण्यात आली आहे.