विमानवारीवर 4.29 कोटी रुपयांचा एमएमआरडीए प्रशासनाने केला चुराडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विमानवारीवर 4.29 कोटी रुपयांचा एमएमआरडीए प्रशासनाने केला चुराडा

Share This
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्राचा विकास करण्यासाठी विशेष प्राधिकरण या नात्याने हजारों कोटीचे प्रकल्प हाती घेणा-या एमएमआरडीए प्रशासनाने अभ्यास दौ-यांच्या नावावर विमानवारी करत 4.29 कोटी रुपयांचा चुराडा केला असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या  एमएमआरडीए प्रशासनाने उदार होत राज्यातील मंत्री, मुख्य सचिव,नगरविकास सचिव,पालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक आणि मंत्र्याच्या खाजगी सचिवांना सुद्धा परदेशी नेत त्यांच्यावरही कोटयांनी खर्च केले आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे देशांतर्गत आणि देशाबाहेर झालेल्या विमानवारीवर केलेल्या खर्चाची माहिती दिनांक 23 जून 2014 रोजी मागितली होती जी त्यांस 11 फेब्रुवारी 2015 रोजी देण्यात आली. एमएमआरडीए प्रशासनाचे कक्ष अधिकारी वि.ग.शिंदे यांनी अनिल गलगली यांस लेखा विभागाने दिलेली माहिती उपलब्ध करुन दिली. दिनांक 1 एप्रिल 2001 पासुन दिनांक 31 मार्च 2014 पर्यंत देशांतर्गत 626 स्थानी बैठक, अभ्यास आणि अन्य कारणासाठी प्रवास करत 1 कोटी 42 लाख 38 हजार 431 रुपये खर्च केले आहे. देशाबाहेर म्हणजे परदेशात 39 स्थानी करण्यात आलेल्या विमानवारीवर 2 कोटी 86 लाख 35 हजार 303 रुपये खर्च झालेले आहे.

देशाबाहेर म्हणजे परदेशात 39 स्थानी करण्यात आलेल्या विमानवारीमध्ये एमएमआरडीए अधिकारीसोबत राज्यातील मंत्री, नगरविकास सचिव,बेस्ट महाव्यवस्थापक आणि मंत्र्याच्या खाजगी सचिवांनी सुद्धा आपले स्वप्न पूर्ण केलेले दिसुन येत आहे. सर्वात जास्त रक्कम 49,18,547 रुपये ही दिनांक 13 नोव्हेंबर 2005 ते 26 नोव्हेंबर 2005 या 14 दिवसांच्या मलेशिया,चीन,कैनडा,यूएसए,जपान,शंघाई,टोकियो आणि टोरंटो येथे झालेल्या तुलनात्मक वाहतुक अभ्यास कार्यक्रमावर (CTS) केली गेली ज्यात राज्यमंत्री राजेश टोपे, सुनील देशमुख,राजेंद्र शिंगणे सोबत रामानंद तिवारी,संजय उबाले,बेस्ट महाव्यवस्थापक स्वाधीन क्षत्रिय, उपसचिव सुधाकर नांगनुरे,डॉ टी.चंद्रशेखर,पीआरके मूर्ति आणि नगर विकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव सी.एस.थोरात यांचा समावेश होता. त्यानंतर स्विजरलैंड, सीडेन, फ्रांस आणि जर्मनी येथील दौ-यात नगर विकास राज्यमंत्री राजेश टोपे यांनी महापौर शुभा राऊल, मुख्यमंत्र्याचे सचिव सी.एस.संगीतराव, उपसचिव सुरेश ककाणी, शंकर देशपांडे तसेच पालिकेतील नगरसेवक आशीष शेलार व राजेश सिंह यांस सोबत नेले होते. शहरी नियोजन, वाहतुक व मालवाहतुक आणि शहरी विकास अश्या कारणासाठी 49,07,687 रुपये खर्च केले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले खाजगी सचिव नितिन करीर, मुख्य सचिव जे पी डांगे आणि  प्रधान सचिव टी सी बेंजामिन यांच्यासोबत यूएसए,मलेशिया आणि सिंगापुर येथील विमानवारीवर रुपये 43,34,177 खर्च केले. हे सर्व महानुभव मोनोरेल प्लान पाहण्या करिता  10 दिवस परदेशातील गल्ली आणि गल्ली फिरत होते.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिनांक 24 नोव्हेंबर 2011 ते 26 नोव्हेंबर 2011 यांच्या 3 दिवसीय लंदन वारीवर 20,34,517 रुपये खर्च झाले. पायाभूत वित्त या विषयावर कांफ्रेंस होती. त्याचशिवाय वाशिंग्टन आणि लंदन येथील वाहतुक फोरम व अभ्यास दौ-यांवर 19,89,836 रुपये खर्च केले ज्यामध्ये  नगर विकास प्रधान सचिव बेंजामिन, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे , एसवीआर श्रीनिवास आणि पीआरके मूर्ति यांचा समावेश होता. वाशिंग्टन येथे एमयूटीपी प्रकल्पाच्या तडजोडीसाठी एमएमआरडीए आयुक्त अजित वर्टी आणि एमयूटीपीचे प्रकल्प संचालक यूपीएस मदान सोबत नगरविकास प्रधान सचिव रामानंद तिवारी यांनी वर्ष 2002 मध्ये 8 दिवस परदेशवारी करत 5,73,794 रुपये खर्च केले. त्यानंतर कुलुलंपर,बैंकाक आणि सिंगापुर येथे 14 दिवसाच्या अभ्यास दौ-यांवर 7,66,460 रुपये खर्च केले ज्यामध्ये डॉ चंद्र शेखर आणि पीआरके मूर्ति सोबत नगरविकास प्रधान सचिव रामानंद तिवारी व माजी एमएमआरडीए आयुक्त ए.के.मागो यांचा सहभाग होता. काही दौरे एकल असुन त्यात रत्नाकर गायकवाड (लंदन),राहुल अस्थाना (इटली,ग्रीस,ओसाका),एसवीआर श्रीनिवास (लंदन),दिलीप कवठकर (फ्रैंकफ्रूट),विजयालक्ष्मी (यूएसए),एस.बी.परदेशी (रॉटरडैम),उमा अडुसुमिलि(जपान), ए.आर.वानखेडे  (चीन,हॉंगकांग), आर.सी.डोहरे (चीन, कौलमपुर और मलेशिया),शरद वरसकर (सीओल व कोरिया) यांचा समावेश आहे. 

नॉइज़ बैरियर्स आणि बेटर एयर क्वालिटी बरोबर वित्त अधिकारी,विधि अधिकारी आणि तांत्रिक सल्लागार यांचा परदेश दौरा साशंकता निर्माण करतो. एमएमआरडीएच्या प्रत्येक आयुक्तांनी आपल्यासोबत गाव जेवण असल्याप्रमाणे एमएमआरडीए बाहेरील मंत्री,अधिकारी आणि खाजगी सचिवांना परदेश दर्शन घडविल्याचा आरोप करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एमएमआरडीए आयुक्त यूपीएस मदान यांस पत्र पाठवुन सर्व देशी-परदेशी दौ-यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. देशांतर्गत रेल्वे किंवा एसटीचा उत्तम आणि स्वस्त पर्याय उपलब्ध असताना कोटयावधी रुपये खर्च का केले गेले? असा सवाल विचारत अनिल गलगली यांनी विडियो कॉन्फ़्रेंसिंग द्वारा अधिकांश स्थानी काम केले जाऊ शकले असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला. भविष्यात देशांतर्गत आणि देशाबाहेर विमानवारीवर खर्चावर अंकुश लावत काटकसर करण्याची सूचना अनिल गलगली यांनी शासनाकडे केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages