रिपाइं एकतावादीचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब तथा जगदीश दोधा इंदिसे यांचे मंगळवारी अल्पश: आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.
मूळचे नंदूरबारमधील असणारे आप्पासाहेब इंदिसे हे 1960 च्या दशकात ठाण्यात रहिवास केला होता. ठाणे शहरामध्ये आंबेडकरी चळवळ रुजवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आंबेडकरी चळवळीशी संबधीत असणाऱया आंदोलनांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये वाढलेल्या आप्पासाहेब इंदिसे यांनी परेरा नगर भागातील गरीब मुलांची शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने त्यांनी एका शिक्षण संस्थेचीही उभारणी केली आहे.
गेले काही दिवस ते आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी त्यांचे शास्त्राrनगर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात बंधू नानासाहेब इंदिसे, पत्नी माजी नगरसेविका द्रोपदाबाई इंदिसे, माजी परिवहन सभापती जितेंद्रकुमार इंदिसे यांच्यासह तीन मुले-मुली, पुतणे भय्यासाहेब इंदिसे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.