फॅन्सी नंबर प्लेटप्रकरणी केंद्राला प्रतिवादी करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फॅन्सी नंबर प्लेटप्रकरणी केंद्राला प्रतिवादी करा

Share This
फॅन्सी नंबर प्लेटबाबत दंड वाढविणे आमच्या अखत्यारीत येत नाही व आम्हाला दंड वाढविण्याचा अधिकारही नाही. दंड वाढविण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दिली होती. याप्रकरणी मंगळवारी हायकोर्टाने केंद्र सरकारला प्रतिवादी करा, असे आदेश देत पुढील आठवड्यात सुनावणी ठेवली.


दादा, भाई, डॉन, भाऊ, बाबा, काका, लव, डॅड, मम्मी, गिफ्ट, दारू अशा नावांच्या फॅन्सी नंबर प्लेटप्रकरणी दंड वाढविण्याबाबत काय विचार केला, अशी मौखिक विचारणा हायकोर्टाने मागील सुनावणीत आरटीओ आणि पोलीस विभागाला केली होती. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती अरुण चौधरी आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. अँड़ रसपालसिंग रेणू यांनी फॅन्सी नंबर प्लेटविरोधात कारवाई करावी, अशी मागणी याचिकेतून केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages