बेस्ट दरवाढीविरोधात निदर्शने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट दरवाढीविरोधात निदर्शने

Share This
मुंबई- बेस्ट उपक्रमाने तिकिट दरवाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसतर्फे मंगळवारी मुंबईत निदर्शने करण्यात आली. काळ्या रंगाचे जॅकेट घालून कार्यकर्त्यांनी बेस्ट प्रशासनाविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. मुलुंडपासून सीएसटीपर्यंत, अणुशक्तीनगर ते मुंबई काँग्रेस कार्यालय आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे पासून काळे कपडे घालून कार्यकर्त्यांनी ‘बेस्ट’ने प्रवास केला. 

यानंतर सायंकाळी साडेचार वाजता आझाद मैदान येथून बेस्ट भवन, कुलाबा येथे पायी मोर्चा काढण्यात आला. तेथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बेस्ट प्रशासनाला निवेदन दिले. मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी बेस्टचे सहमहाव्यवस्थापक उरणकर यांना भेटून दरवाढ रद्द करावी, असे निवेदन दिले. यावेळी त्यांच्याबरोबर मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस धर्मेश व्यास, प्रवक्ते विनोद शेखर, माजी नगरसेवक प्रमोद मांद्रेकर उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages