मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा सन 2015 - 2016 वर्षाचा 2501 कोटि 35 लाख रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराड़े यानि शिक्षण समिति अध्यक्ष विनोद शेलार याना सादर केला.संन 2014 -15 चा अर्थसंकल्पीय अंदाज 2312.96 कोटि रुपयांचा होता. सन 2015-16 सालचा अर्थसंकल्पीय अंदाज 2143.21 कोटि र्पयांचा असून मागील वर्षा पेक्षा 169.21 कोटीची घट प्रस्तावित करण्यात आली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या शालेमधिल विद्यार्थ्याना मिळणारा शालेय पोषण आहार ही योजना बंद करण्यात आली आहे. यामुले पालिका शालेतिल 4 लाख 50 हजार विद्यार्थ्याना याचा फटका बसणार आहे. पालिकेच्या आठवी इयत्तेत्तील विद्यार्थयाना ट्याब देवून दप्ताराचे ओझे कमी केले जाणार आहे.
वैशिष्ठे
202 नव्या व्हर्चुअल क्लासरुमसाठी 17.67 कोटि
शाला संगणक व् इंटरनेट जोड़नीसाठी 60 लाख
शालांच्या इमारती दुरुस्ती पुनर्बांधनीसाठी 248 कोटि
कोम्पुटर ल्याब निर्मितीसाठी 17 कोटि
शाला गुणवत्ता वाढ प्रकल्प ५ कोटी
प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र ३. ३२ कोटी
बेंचसाठी ७. २५ कोटी
विद्यार्थ्याना ट्याब ३४.३७ कोटी
मोफत पाठ्यपुस्तके शैक्षणिक साहित्य ९९ कोटी १५ लाख
शिक्षण विभागाचे संकेतस्थळ १० लाख
शालेय आरोग्य कार्यक्रम १२ लाख
विद्यार्थीनीना उपस्थिती भत्ता ४७ कोटी
विद्यार्थ्याना बसभाड़े १० कोटी
शिष्यवृत्तीसाठी ७ लाख
अनुदानीत शालांना अनुदान व निवृत्ती वेतन ३११ कोटी
बालवाडयाना अनुदान २ कोटी ५६ लाख
