मुंबई - महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात कॅन्सर वेगाने पसरत आहे. आतापर्यंत साडेचार लाख लोकांना कॅन्सरने ग्रासले आहे. भारतात २५ ते ३० लाख कॅन्सरचे रुग्ण असून त्यात दरवर्षी नऊ ते दहा लाख नवीन रुग्णांची भर पडत आहे.
एका अहवालानुसार बालक व महिलांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत आहे. त्यातही पुरुषांत जबडा, घसा, फुफ्फुस, जठराचा कर्करोग, तर महिलांमध्ये गर्भपिशवीच्या तोंडाजवळचा, स्तनाचा व अंडाशयाचा कर्करोग आढळतो. गेल्या ३० वर्षात तंबाखू सेवनाने कर्करोगाचे झाल्याचे प्रमुख कारण आहे.
स्वातंत्र्यानंतरही तंबाखूच्या दुष्परिणामाची सरकारला जाहिरात करावी लागते ही दुर्देवाची बाब आहे. सरकारला तंबाखूच्या दुष्परिणामांपासून वाचवायचे असल्यास मुळात तंबाखू लागवडीलाच बंदी घातली पाहिजे. एका बाजूला तंबाखूची लागवड उघडपणे होत आहे तर तिच्यापासून तयार होणा-या उत्पादनांवर निर्बंध घालण्याचा आटापिटा करीत आहे, असे मत वाशी येथील स्टìलग वोक्हार्ट हॉस्पिटलचे कर्करोगतज्ञ डॉ. शिशिर शेट्टी व्यक्त केले.
कर्करोगाचे महाराष्ट्रात आढळलेले रुग्ण
वर्ष रुग्ण
२०११ ९५, ६७४
२०१२ ९७, ६७४
२०१३ ९९, ८७१
२०१४ १ लाख २ हजार
२०११ ९५, ६७४
२०१२ ९७, ६७४
२०१३ ९९, ८७१
२०१४ १ लाख २ हजार
