मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)च्या वतिने महिला आघाडीने संयुक्त जयंती व आई पुरस्कार वितरण समारंभ काल दि.१२ रोजी आयोजित करण्यात आला होता.विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पाठी त्यांच्या आईच्या त्यागाचा व मेहनतीचा हात होता त्याबद्दल छोटीशी कृतज्ञता म्हणुन जीजामाता,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,भिमाई यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्त हा पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्काराच्या मानकरी ठरलेले शांताआई कांबळे,रामदास आठवलेंच्या आई हौसाबाई आठवले,सम्राट या वृत्तपत्राचे संपादक बबन कांबळे यांच्या आई हौसाआई कांबळे,खा.भालचंद्र मुणगेकर यांच्याभगीनी विजया कदम व गिर्यारोहक आनंद बनसोड यांच्या आई सावित्रीबाई बनसोड यांनामानचिन्ह देउन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष खा रामदास आठवले,खासदार पुनम महाजन ,महापौर स्नेहल आंबेकर,खासदार भालचंद्र मुणगेकर,सीमा रामदास आठवले,सम्राट या वृत्तपत्राचे संपादक बबन कांबळेआदी मान्यवरांची उपस्थिती होती.
