मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांना कोणतीही पुर्व सूचना न देता वडाळा येथील सिध्दार्थ वसतिगृह पाडण्यासाठी केलेली कारवाई ही अन्याय कारक आहे. राज्य सरकार एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन मधील घर विकत घेते, तर दुसरीकडे मुंबई महापालिका ऐन परिक्षेच्या काळात मुंबईतील गरीब विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांनी सुरु केलेले वसतिगृह पाडते हे कितपत योग्य आहे. असा सवाल करित विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सिध्दार्थ वस्तीगृहाची उभारणी पुन्हा त्याच जागेवर करण्यात यावी व गरिब विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर व पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सिध्दार्थ वसतिगृहास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे, व माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ते म्हणाले वडाळा येथील सिद्धार्थ हॉस्टेलची इमारत दोन दिवसांपुर्वी मुंबई महानगरपालिकेने धोकादायक इमारतीच्या नावाखाली पाडण्यासाठी रिकामी करण्यात आली. त्यावेळी तेथील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची पुर्व कल्पना न देता अमानुषपणे मारहाण करुन या वसतिगृहात राहणाऱ्या गरिब विद्यार्थ्यांचे सामान रस्त्यावर फेकून देण्यात आले. या कारवाईमुळे परिक्षेच्या तोंडावर हे विद्यार्थी रस्त्यांवर आले आहेत. झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय असून विद्यार्थ्यांना अमानुष पणे मारहाण करणाऱ्या, मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी पोलिसांवर एक्ट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी यावेळी मुंडे यांनी केली .तसेच हे वसतिगृह पुन्हा एकदा त्याच जागी उभे करण्यासाठी राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्पात तरतूद करावी अन्यथा हे अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.